आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Venezuelan Woman Earns Apartment After Hitting President With Mango

राष्ट्रपतींना आंबा फेकून मारला, मिळाला फ्लॅट!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काराकस - जगभरात नेत्यांचा निषेध करावयाचा असेल किंवा एखाद्या धोरणाला विरोध करावयाचा असेल तर लोक अंडी, टोमॅटो किंवा दगड फेकून मारतात. सहसा असे काही घडले तर आरोपीला तत्काळ अटक केली जाते. लॅटिन अमेरिकेतील व्हेनेझुएला या देशात मात्र वेगळाच प्रकार घडला. राष्ट्रपती निकोलस मादुरो यांना एका महिलेने चक्क आंबा फेकून मारला आणि काही तासांतच तिला चक्क फ्लॅट मिळाला.

मादुरो पूर्वी बसचालक होते. अजूनही कधी-कधी ते जनतेशी संवाद साधता यावा म्हणून बस चालवतात. यादरम्यान, अरागा प्रांतात बस चालवत असताना त्यांना कुणीतरी आंबा फेकून मारला. चौकशीअंती समजले की मारलेनी ओलिव्हियो नामक महिलेने हा प्रकार केला. मादुरो यांनी आंबा उचलला. त्यावर लिहिले होते की, "आपण माझ्याशी चर्चा करू शकाल...' सोबत फोन नंबरही होता. काही वेळातच मादुरो यांनी हा आंबा एका टीव्ही कार्यक्रमात दाखवला. फोनवरून माहिती घेतल्यावर या महिलेस राहण्यासाठी घर नसल्याचे त्यांना कळले होते. टीव्हीवरच त्यांनी आपण तिच्यासाठी एक फ्लॅट मंजूर केला असल्याचे जाहीर केले. हा आंबा निश्चितच गोड असेल, असे म्हणत आपण तो नंतर खाऊ, असेही ते म्हणाले. एखाद्या नागरिकाने संतापून काहीतरी फेकून मारावे आणि राष्ट्रपतींनी त्यावर गांभीर्याने िवचार करून निर्णय घ्यावा, असे हे आदर्श उदाहरण ठरले आहे.