आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या देशात भिकेला लागले मध्यमवर्गीय, श्रीमंतांच्या सुरु लॅव्हिश पार्ट्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काही महिन्यांमध्ये व्हेनेझुएला आर्थिक संकटात सापडला आहे. - Divya Marathi
काही महिन्यांमध्ये व्हेनेझुएला आर्थिक संकटात सापडला आहे.
कराकस - लॅटिन अमेरिकेतील एक संपन्न देश अशी ओळख असलेल्या व्हॅनेझुएलाला गेल्या काही महिन्यात भिकेचे डोहाळे लागले आहेत. वास्तविक याचा परिणाम येथील मध्यमवर्गीयांवरच दिसून येत आहे. श्रीमंतीत जगणाऱ्यांच्या रिच लाइफस्टाइलमध्ये यामुळे कोणताही बदल झालेला नाही. मध्यमवर्गीय कुटुंब कचऱ्यामध्ये अन्न शोधून पोटाची खळगी भरत आहेत, तर श्रीमंत वर्ग महागड्या क्लबमध्ये लॅव्हिश पार्टीजमध्ये मौजमस्ती करत आहेत.

एव्हरेज सॅलरीपेक्षा 458 पटीने जास्त आहे क्लबची मेंबरशिप
- फोटोत वरच्या बाजूला दिसत असलेला फोटो व्हेनेझुएलाच्या कराकस कंट्री क्लबमधील लॅव्हिश पार्टीचा आहे.
- यात दिसत आहे, की ग्लॅमरस ड्रेसमध्ये महिला ड्रिंक्स आणि वेगवेगळ्या डिशेसचा स्वाद चाखत आहे.
- या क्लबची मेंबरशिप फी 73 लाख रुपये (77,000 पाउंड) आहे.
- ही येथील सरासरी मिळणाऱ्या सॅलरीच्या 458 पटीने जास्त आहे.
- या क्लबपासून थोड्या अंतरावर पेटेयर झोपडपट्टी आहे. तिथे 3,70,000 लोक राहातात.
- येथे राहात असलेल्या मध्यमवर्गीय लोकांना नाइलाजास्तव कचऱ्यामध्ये अन्न शोधावे लागत आहे.

फळे आणि भाज्या झाल्या लक्झरी अॅटम
- कराकसमध्ये रस्त्याच्या कडेला कचऱ्यात पडलेली फळे आणि भाज्या निवडणारे लोक ठिकठिकाणी पाहायला मिळतील.
- फळे आणि भाज्या खरेदी करणे येथे लक्झरी अॅटम विकत घेण्यासारखे झाले आहे.
- या देशात अन्नधान्य आणि औषधांचा पुरवढा कमी झाल्यामुळे महागाई आकाशाला भिडली आहे.
- लोकांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत पडली आहे.
- येथील हॉस्पिटल्सच आयसीयूमध्ये आहेत, तर मेडिकल स्टोअर्समध्ये अत्यावश्यक औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे.

सरकार विरोधात लोकांमध्ये प्रचंड रोष
- इलेक्ट्रॉनिक कंपनीमध्ये 1340 रुपये (14 पाउंड) महिन्याने काम करत असलेला वाले वनीसा म्हणाला, 'सरकार आणि भांडवलदारांनी मिळून देशाला लुटले आहे. सगळे श्रीमंत लोक चोर आहेत. त्यांनी देशाचा पैसा गडप केला आहे.'
- त्यांना या परिस्थितीत बदल व्हावा असे मुळीच वाटत नाही. त्यामुळे त्यांच्या लाइफ स्टाइलमध्ये फरक पडेल अशी भीती त्यांना वाटते. चावेज (माजी राष्ट्राध्यक्ष) स्वतःला मोठा सोशलिस्ट सांगतो मात्र तो गर्भश्रीमंत आहे आणि पाखंडी आहे. ही त्याच्याच कर्माची फळे आहेत ज्यामुळे आज लोकांना उकिरडे शोधत फिरावे लागत आहे.

का उद्भवली अशी परिस्थिती
गेल्या 20 वर्षांपासून व्हेनेझुएलाची अर्थव्यवस्था ढासळत चालली होती. देशात मोठ्या प्रमाणात राष्ट्रीयकरण आणि नियमांमुळे प्रायव्हेट सेक्टरी परिस्थिती बिघडत चालली होती. भ्रष्टाचार तर परमोच्च सीमेवर पोहोचला होता. अब्जावधी रुपयांचा हिशेब नाही. ट्रान्सपेरंन्सी इंटरनॅशनलनेही व्हेनेझुएलाला सर्वात भ्रष्ट देश म्हटले आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑइलच्या किंमती कोसळल्याने येथे आर्थिक संकट निर्माण झाले. देशात वीज आणि खाद्य पदार्थांचा पुरवठा कमी झाला. काही काळासाठी देशात आणीबाणी देखील लागू करण्यात आली होती.

पुढील स्लाइडमध्ये फोटोजमधून पाहा देश कसा गेला रसातळाला
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...