आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येथे थंडीमुळे रेल्वे रुळांचे झाले असले हाल, मानवाचे काय होत असेल...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - भारतासह अनेक देशांमध्ये हिवाळा आला आहे. अनेक देशांमध्ये आता थंडीची लाट पसरण्यास सुरुवात झाली आहे. यात सर्वाधिक थंडी असलेल्या ठिकाणांबद्दल बोलावयाचे झाल्यास रशियाच्या सायबेरिया सर्वात कुख्यात आहे. येथील वर्खोयांस्क शहरातील थंडीची (उणे 67 अंश सेल्सियस) तर गिनीज बुकात नोंद आहे. गेल्या वर्षी सुद्धा येथे -67 अंश सेल्सियस इतकी थंडी होती. केवळ थंडीच नव्हे, तर बर्फाळ संकटातील सर्वात भयंकर प्रकार थॉइंग पर्माफ्रॉस्टचे हे डेंजर झोन आहे. थर्माफ्रॉस्ट बर्फाखाली दबलेली जाड आणि थंड थर आहे. ज्याच्या संपर्कात येणारे डोंगर आणि लोखंड सुद्धा गोठून तुकडे होतात. येथील रेल्वे रुळांचे हे फोटोज त्याचेच फलित आहे. या ठिकाणाबाबत सविस्तर जाणून घेऊया...


बर्फाची समाधी होणार सायबेरिया
> सर्वात चिंतेचा विषय हा आहे, की सायबेरियात पडणाऱ्या थंडीत दरवर्षी सातत्याने वाढ होत आहे. ग्लोबल वार्मिंग जेवढी घातक आहे, तेवढीच येथे वाढणारी थंडी चिंतेचा विषय आहे. 
> याबाबत अमेरिका आणि रशियाच्या संशोधकांनी जारी केलेल्या अहवालानुसार, अशीच थंडी वाढत गेल्यास 2050 पर्यंत रशियाचा हा परिसर बर्फाच्या समाधीत परिवर्तित होणार आहे. 
> 'थॉइंग पर्माफ्रॉस्ट' (नेहमीसाठी गोठवणारी प्रक्रिया) याचे प्रमुख कारण असणार आहे. 
> या अहवालासह सायबेरियातील काही फोटोज देखील प्रसिद्ध करण्यात आले आहेत. 

 

काय आहे थॉइंग पर्माफ्रॉस्ट?
> पर्माफ्रॉस्ट बर्फाखाली दबलेला एक जाड आणि थंड थर आहे. जमीन गरम होताच हा थर वर येतो.
> पर्माफ्रॉस्ट वर येताच त्याच्या संपर्कात येणारी जमीन, वस्तू, ठिकाण आणि मनुष्य जागीच बर्फ होतात. डोंगर, दगड आणि लोखंड सुद्धा यास अपवाद नाही. अख्ख्या नद्या देखील या थराच्या संपर्कात येताच गोठतात. 
> सध्या रशियातील सायबेरिया, अलास्का आणि कॅनडाच्या जवळपासचे परिसर पर्माफ्रॉस्ट झोनमध्ये येतात. 
> पर्माफ्रॉस्ट प्रक्रियेत जमीन संकुचन पावते. त्यामुळेच सायबेरियात ठिक-ठिकाणी रेल्वे रुळा विक्षिप्त आणि उखडलेल्या दिसून येतात. 
> झाडे आणि झुडूप सुद्धा नष्ट होत असल्याने कार्बनडाय ऑक्साइडचे प्रमाण वाढते आणि बर्फाचे वादळ येतात. या वादळात बर्फाळ डोंगरांचे तुकडे घरांवर उडून येतात आणि खूप मोठी जिवीत आणि वित्तहानी होते. 

 

रशियाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होण्याची भिती
> जगातील सर्वात मोठ्या क्षेत्रफळाचा देश रशियाची अर्थव्यवस्था प्रामुख्याने सायबेरियावर विसंबून आहे. अशात सायबेरियाला नुकसान झाल्यास त्याचा फटका समस्त रशियावर होईल आणि रशिया आर्थिक डबघाईला येईल. 
> सायबेरियात रशियाच्या मोठ-मोठ्या पेट्रोलियम, नैसर्गिक गॅस, सोने आणि मोल्यवान हिऱ्यांच्या खाणी आहेत. 
> त्यामुळेच, यूएन आणि अमेरिकेकडून निर्बंध असतानाही रशियाच्या अर्थव्यवस्थेला फारसे नुकसान झालेले नाही. 


पुढील स्लाइड्सवर पाहा, या बर्फाळ वाळवंटाचे आणखी काही फोटोज...

बातम्या आणखी आहेत...