आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष: ‘मोदी सिद्धांता’ने झाला संकोच दूर!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली / वॉशिंग्टन - अमेरिकेच्या संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणाचा प्रभाव अद्यापही दिसून येत आहे. आपल्या भाषणातून मोदींनी मांडलेल्या दृष्टिकोनाचे आेबामा प्रशासनाने शुक्रवारी ‘मोदी डॉक्ट्रिन’ अर्थात मोदींचा सिद्धांत असे नामकरण केले. त्यांच्या भाषणामुळे परराष्ट्र धोरणाला नवी दिशा दिली आहे. एवढेच नव्हे तर ऐतिहासिक असे संकोचही दूर झाले आहेत, असे उपपरराष्ट्र मंत्री निशा देसाई-बिस्वाल यांनी म्हटले आहे.

बिस्वाल म्हणाल्या, स्पष्ट व दमदार दृष्टिकोन हाच या भेटीचा महत्त्वाचा परिणाम म्हटला पाहिजे. मोदींनी अमेरिकेच्या काँग्रेसमध्ये तो मांडला. मी त्याला मोदी डॉक्ट्रिन म्हणते. मोदी यांनी दहशतवादावर व्यावहारिक गोष्टी सांगितल्या. सागरी मार्गांची सुरक्षा तसेच सागरी वाहतुकीच्या स्वातंत्र्याचा मुद्दाही त्यांनी मांडला. आपसातील सहमतीतून तयार करण्यात आलेल्या सुरक्षा व्यवस्थेतील गोंधळामुळे अनिश्चितता निर्माण होते, असे ‘मोदी डॉक्ट्रिन’सांगते. त्यातून आंतरराष्ट्रीय कायद्याला भारताचा पाठिंबा आहे, हे दिसून येते. त्याचबरोबर इतर देशांकडूनही त्याच्या अंमलबजावणीची अपेक्षाही त्यातून आहे. शुक्रवारी ‘मोदींच्या दौऱ्याचे सुरक्षात्मक तसेच रणनीतीच्या पातळीवरील परिणाम’या विषयावरील चर्चेत बिस्वाल यांनी हा मुद्दा मांडला. दरम्यान राष्ट्राध्यक्ष बराक आेबामा यांचा कार्यकाळ आता केवळ सहा महिन्यांचा राहिला आहे.
शक्ती बनवण्याठी पाठिंबा : वर्मा
मोदी यांच्या दृष्टिकोनाचे अमेरिका स्वागत करते. भारताला प्रमुख शक्ती बनवण्यासाठी स्पष्ट तसेच रणनीतीच्या पातळीवर पाठिंब्याचे निश्चित केले आहे. अर्थव्यवस्थेतच नव्हे तर जगात स्वच्छ ऊर्जेच्या क्षेत्रात भारताने नेतृत्व करावे, असे आम्हाला वाटते, असे राजदूत रिचर्ड वर्मा यांनी सांगितले.

आेबामांची रणनीती महत्त्वाची
आेबामा प्रशासनाची संतुलित रणनीती भारत तसेच आशियाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. भारत-प्रशांतची सुरक्षा तसेच समृद्धीवरच आपली सुरक्षा व समृद्धी अवलंबून आहे, असे अमेरिकेला वाटते, असे निशा बिस्वाल यांनी सांगितले. त्यावर अमेरिकेला आपल्या परदेश धोरणाची दिशा ठरवणे सोपे जाणार आहे.
बातम्या आणखी आहेत...