आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vice President Of Maldiv Arrested In Case Of Murder Attempt Of President

मालदीव : राष्ट्राध्यक्षांच्या हत्येचा कट रचल्याच्या आरोपात उपराष्ट्राध्यक्ष अटकेत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मालदीवचे उपराष्ट्राध्यक्ष अहमद अदीब आणि राष्ट्राध्यक्ष अब्दुल्ला यामीन (उजवीकडे)). - Divya Marathi
मालदीवचे उपराष्ट्राध्यक्ष अहमद अदीब आणि राष्ट्राध्यक्ष अब्दुल्ला यामीन (उजवीकडे)).
माले - मालदीवचे राष्ट्राध्यक्ष अब्दुल्ला यामीन यांच्या हत्येचा कट रचल्याच्या आरोपात उपराष्ट्राध्यक्ष अहमद अदीब यांनी शनिवारी अटक करण्यात आली. मालदीवचे उपराष्ट्राध्य७ अदीब यांच्यावर यामीन यांच्या बोटीवर बॉम्ब पेरल्याचा आरोप आहे. 28 सप्टेंबरला यामीन यांच्या बोटीवर हल्ला झाला होता. त्यात ते थोडक्यात बचावले होते.

सरकारने काय सांगितले?
> मालदीवच्या होम मिनिस्ट्रीने दिलेल्या माहितीनुसार राष्ट्राध्यक्षांच्या हत्येच्या प्रयत्नानंतर उपराष्ट्राध्यक्ष फरार होते.
> अरेस्ट केल्यानंतर अदीब यांना धूनधो डिटेंशन (प्रिझन आयलँडमध्टे ठेवण्यात आले आहे.
> उपराष्ट्राध्यक्षांवर देशद्रोहाचा आरोपही लावण्यात आला आहे.
> उप राष्ट्राध्यक्षांना अटक केल्यानंतर सरकारने मालेमध्ये सुरक्षेत वाढ केली आहे.

काय झाले होते, राष्ट्राध्यक्षांबरोबर ?
> मालदीवचे राष्ट्राध्यक्ष अब्दुल्ला यामीन गेल्या महिन्यात हजहून देशात परतत होते. त्यावेळी त्यांच्यावर हल्ला झाला होता.
> अब्दुल्ला जेव्हा एअरपोर्टहून समुद्राच्या मार्गे माले आयलंडला जात होते, त्यावेळी त्यांच्या सीपडबोटवर हल्ला करण्यात आला होता. त्यात ते थोडक्यात होते.
> या हल्ल्यात त्यांच्या पत्नीसह अनेक अधिकारीही जखमी झाले होते.

पुढील स्लाइड्सवर पाहा, मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांवरील हल्ल्याचे PHOTOS