आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘दहशतवादाविरोधात दुसऱ्या महायुद्धासारखा विजय शक्य’ - व्लादिमीर पुतीन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मॉस्को- कोणत्याही दहशतवादाच्या विरोधात दुसऱ्या महायुद्धातील विजयाप्रमाणे रशिया पुन्हा यश मिळवू शकतो. ७२ वर्षांपूर्वी रशियाने हे करून दाखवले आहे. म्हणूनच आता जगाने एकजूट दाखवण्याची वेळ आली आहे, असे आवाहन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी केले.  

१९४५ मध्ये रशियाने नाझी जर्मनीला पराभूत केले होते. त्याच्या स्मृतीनिमित्त मंगळवारी लष्कर संचलनाच्या निमित्ताने आयोजित समारंभात पुतीन बोलत होते. गतकाळातील युद्धावरून आपण धडा घेण्याची गरज आहे. त्यातून आपल्या पिढीला एक प्रकारचा इशारा मिळतो. जगभरात कोणत्याही प्रकारची आक्रमकता दिसून आल्यास तिला ठेचून काढण्यास रशियाचे सैन्य सक्षम आहे. 

सध्याच्या परिस्थितीत संरक्षणाच्या क्षमता वाढवण्याची अनिवार्यता दिसून येते. दहशतवाद, आक्रमकता, नाझीवाद इत्यादीसारख्या कट्टरवादाचा मुकाबला करण्यासाठी मात्र आंतरराष्ट्रीय समुदायाची एकजूट असली पाहिजे, असेही पुतीन यांनी म्हटले आहे.  
बातम्या आणखी आहेत...