आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: ISIS ने हत्येसाठी निवडला नवा मार्ग, शत्रूला रॉकेट लाँचरने उडवले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दमिश्क - दहशतवादी संघटना आयएसआयएसचा एक ताजा व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये दहशतवादी एका व्यक्तीला एका मिनी रॉकेट लाँचरने उडवून देतात. आयएसआयएसच्या आतापर्यंत समोर आलेल्या व्हिडिओमध्ये हा पहिला व्हिडिओ असा आहे, ज्यात एखाद्या व्यक्तीला अशा पद्धतीने मारण्यात आले आहे.
डेली मेलच्या वृत्तानूसार, रॉकेट लाँचरने उडविण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव इब्राहिम शेरीदाह होते. इब्राहिम ट्यूनिशिया आणि मोरक्कोच्या एका संघटनेचा कार्यकर्ता होता. या संघटनेने आयएसआयएसविरोधात युद्ध पुकारले आहे. इब्राहिमला रॉकेट लाँचरने उडविल्यानंतरही दहशतवाद्यांनी त्याच्यावर रायफलने गोळीबार केला.
व्हिडिओमध्ये दिसते, की दहशतवादी रॉकेट लाँच करतात आणि पुढच्याच क्षणाला इब्राहिम आगीच्या ज्वाळांमध्ये असतो. तो ज्या संघटनेचा सदस्य होता, त्या संघटनेचे जवळपास एक हजार सदस्य आयएसविरोधात लढत आहेत. इब्राहिमच्या मृत्यूनंतर आयएसचे दहशतवादी जोरदार घोषणा देतात आणि हवेत गोळीबार करुन आनंद साजरा करताना व्हिडिओत पाहायला मिळतात. याआधी आयएसने एका विदेशी वैमानिकाला पिंजऱ्यात कैद करुन जिवंत जाळले होते. तसेच लहान मुलांच्या हातूनही त्यांनी शत्रूंवर गोळीबार केल्याचे व्हिडिओ समोर आले आहेत.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, VIDEO