आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लीबियाचा क्रूर हुकुमशहा गद्दाफीचा अंतही झाला होता तेवढाच क्रूर, वाचा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गद्दाफी अशा प्रकारे पूर्णपणे रक्तबंबाळ झाला होता. - Divya Marathi
गद्दाफी अशा प्रकारे पूर्णपणे रक्तबंबाळ झाला होता.
इंटरनॅशनल डेस्क- हुकूमशहा मुअम्मर गद्दाफीच्या मृत्यूच्या संदर्भातील एक व्हिडीओ गेल्या वर्षी समोर आला होता. त्यात क्रूर गद्दाफीचा मृत्यूदेखिल तेवढ्याच क्रूरपणे झाला असल्याचे पाहायला मिळते. या व्हिडीओमध्ये गद्दाफीचा चेहरा रक्ताने माखलेला असून त्याच्या कपड्यांमधूनही रक्त टपक असल्याचे व्हिडीओमध्ये दिसते. बंडखोर मात्र आनंदाने नाचत आहेत.
 
मरण्यापूर्वी दयेची भीक मागत होती गद्दाफी...
 
- 33 सेकंदाच्या या मोबाइल व्हिडीओमध्ये गद्दाफी शेवटच्या घटका मोजत असल्याचे जाणवते. 
- अनेक बंडखोर गद्दाफीचे केस पकडून त्याला ओढत नेताना दिसत आहेत. 
- त्यानंतर ते गद्दाफीला उचलून एका ट्रकच्या बोनटवर फेकतात. 
- त्यानंतर एक मुलगा त्यावर चढतो, तर दुसऱ्या मुलाने बंदूक रोखलेली आहे. 
- यावेळी गद्दाफीचा चेहरा रक्ताने माखलेला आहे. 
- 20 ऑक्टोबर 2011 रोजी बंडखोरांनी गद्दाफीची सिरते शहरात हत्या केली होती. याच शहरात गद्दाफीचा जन्म झाला होता.
 
कोणी बनवला होता व्हिडीओ..
 
- बीबीसीच्या मते, अयमान अलमानी नावाच्या बंडखोराने हा व्हिडीओ तयार केला होता. 
- त्यावेळी बंडखोर हवेत बंदूक वर करून, गोळ्या झाडून जल्लोष करत होते. 
- त्यापूर्वी अशा प्रकारचे फुटेज कधीही पाहायला मिळाले नाही.
 
पुढील स्लाईड्सवर पाहा, संबंधित PHOTOS ....
बातम्या आणखी आहेत...