आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Video Of German wings Plane That Crashed Into French Alps

VERY DISTURBING: फ्रान्सचे विमान कोसळण्यापूर्वी प्रवाशाने शुट केलेला व्हिडिओ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फ्रान्समध्ये जर्मनविंग्ज विमान कोसळण्यापूर्वी प्रवाशाने शुट केलेला व्हिडिओ अगदी अंगावर काटा उभा करणारा आहे. यात प्रवासी मोठमोठ्याने रडताना, ओरडताना दिसून येतात. कोसळलेल्या विमानाच्या अवशेषात सापडलेल्या एका मोबाईल फोनच्या सिमकार्डमध्ये हा व्हिडिओ आढळून आला आहे.
फ्रान्समधील अल्प्स पर्वतरागांमध्ये हे विमान कोसळले होते. या विमानाचा वैमानिक मानसिक स्थीर नव्हता, असे यानंतर आलेल्या वृत्तांमध्ये स्पष्ट झाले होते. जर्मनविंग्ज विमानाच्या प्रवाशाने शुट केलेला हा अंतिम क्षणांचा व्हिडिओ फारच भय उत्पन्न करणारा आहे. फ्रेंच मॅगझिन पॅरिस मॅचने हा व्हिडिओ जाहीर केला आहे. यात विमान कोसळत असताना आतील परिस्थिती कशी होती, हे दिसून येते.
या व्हिडिओतील फुटेज अस्थीर आहे. विमानाचे कॅबिन चक्क एका बाजूला झुकलेले दिसून येते. यावेळी प्रवासी प्रचंड मोठ्या आवाजात ओरडत आहेत. महिलांच्या किंकाळ्या ऐकू येत आहेत. मध्येच हा व्हिडिओ थांबतो. आणि सगळं संपतं. कायमचं.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, अंगावर काटा आणणारा हा व्हिडिओ....