आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ताशी 185 मील वेगाने इमारतीतून बाहेर काढले विमान, पाहा VIDEO...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क- ब्रिटिश पायलट पॉल बॉनहोमी आणि स्टीव जोन्स यांनी बिल्डिंग (हॅंगर)च्या आतून विमान सुरक्षित बाहेर काढून एक विक्रम नोंदवला आहे. याला एयरोबेटिक्समधील सर्वात धोकादायक स्टंट मानले जात आहे. यादरम्यान दोन्ही विमानाचा वेग 185 मील प्रति तास इतका होता. हा स्टंट नॉर्थ वेल्समध्ये करण्यात आला. या हॅंगरची उंची सुमारे 25 फुट इतकी होती.
एक छोटीशी चूक जीव घेऊ शकले असते-
पायलट बॉनहोमी याने सांगितले की, हा आमच्या आयुष्यातील सर्वात मोठा स्टंट होता. यात एका छोटीशा चूकीची शक्यता नव्हती. मात्र, एका चुकीमुळे हे विमान बिल्डिंगला धडकले असते. आम्ही दोघे हे मागील 17 वर्षे एकत्र स्टंट करीत आहोत. पॉल बॉनहोमीने सांगितले की, या वर्षी ऑगस्ट महिन्यात एस्कोट (ब्रिटन)मध्ये होणा-या रेड बुल एयर रेसमध्ये सहभाग घेणार आहोत.
पाहणा-यांसाठी अनोखा अनुभव
हा स्टंट एचडी 360 डिग्रीत कॅमे-याने शुट केला. तसेच याद्वारे दावा केला आहे की, हा स्टंट पाहणा-यांना एक नवीन अनुभव मिळेल. पायलट पॉलने सांगितले की, जर आम्ही विमान थोडेसेदेखील खाली अथवा वर नेले असते तर ती आमची चुक ठरली असती. मात्र, शेवटी आम्ही बरोबर ठरलो. आमच्यासाठी ही एक मस्ती होतीच व विस्मयकारकही होते. दूसरे पायलट स्टीव जोन्स म्हणाले की, तुम्ही जेव्हा 185 मील प्रति तासाच्या वेगाने उड्डाण करत असता आणि 200 यॉर्डावर एक हॅंगर आडवा येतो तेव्हा तुमच्यापुढे काहीही पर्याय उरत नाही. तेव्हा तुम्ही खाली पडता. तुम्ही हॅंगरपासून आपली लाईन चेक करू शकता आणि सुरक्षितपणे बिल्डिंगमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करता. आम्ही तेच केले.
पुढे स्लाईड्समध्ये पाहा, स्टंटशी संबंधित फोटोज...
बातम्या आणखी आहेत...