आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Video Taken From International Space Station Shows UFOs

VIDEO: नासाच्या कॅमेऱ्यात टिपल्या गेल्या विचित्र आकृत्या, पृथ्वीवरुन जात होत्या अंतराळात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन- पृथ्वीच्या वातावरणातून निघून अंतराळात जात असलेल्या तीन विचित्र आकृत्यांचे व्हिडिओ फुटेज यु-ट्युबवर व्हायरल झाले आहे. चार मिनिटांचा हा व्हिडिओ एका आठवड्यापूर्वी अपलोड करण्यात आला होता. आतापर्यंत आठ लाख लोकांनी तो बघितला आहे.
हा व्हिडिओ आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनवरुन शुट करण्यात आला होता. नासाच्या अर्थ व्युइंग लाईव्ह फीडमधून हे फुटेज रेकॉर्ड करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. www.wnd.com च्या अहवालानुसार, यात व्हिडिओत तीन विचित्र आकृत्या दिसतात. पृथ्वीच्या वातावरणातून निघून अंतराळात त्या जात आहेत. या वस्तू अंतराळाच्या दिशेने जातात तेव्हा नासाकडून व्हिडिओ फीड रोखले जाते.
यानंतर डिस्प्ले मेसेजमध्ये सांगितले आहे, की आमच्यासोबत राहा. हाय डेफिनेशन अर्थ व्युइंग एक्सपेरिमेंटमध्ये कॅमेरा बदलला जातोय किंवा इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमधून मिळणारे सिग्नल तुटत आहेत. व्हिडिओ आणि नासाच्या अॅक्शनवर युजर्स टोकदार प्रतिक्रिया देत आहेत.
एका व्यक्तीने लिहिले आहे, की अखेर ते पृथ्वीवरुन निघताना कॅमेऱ्यात टिपले गेले आहेत. याबाबत नासाने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
पुढील स्लाईडवर बघा, नासाच्या व्हिडिओचे काही स्टिल....