आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेत ओरोविल धरणाच्या कालव्याला तडा जाण्यापूर्वीचे दृश्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेतील ओरोविल हे धरण आहे. येथील पाण्याचा विसर्ग होणाऱ्या कालव्यात काही दिवसांपूर्वीच मोठी भेग पडली. यामुळे तेथे मोठा खड्डा निर्माण झाला. या घटनेनंतर संपूर्ण अमेरिकेतीलच धरणाच्या बांधकामातील उणिवांचा आढावा घेतला जावा, असा विचार सुरू आहे. कारण काही पर्यावरण समूहांनी १२ वर्षांपूर्वीच हा कालवा तकलादू असल्याचे निदर्शनास आणून दिले होते. यामुळे परिसरात राहणाऱ्या दोन लाखांहून अधिक नागरिकांना त्रास होऊ शकतो असाही इशारा दिला होता. मात्र त्या वेळी सर्वांनी याकडे दुर्लक्ष केले. 

धरणाचा कालवा दर्शवणारे हे छायाचित्र खड्डा पडण्यापूर्वीचे आहे. आता पाण्याची पातळी वाढल्याने धरणाची पार्किंगदेखील पाण्याखाली गेली आहे. आसपासच्या परिसरात पावसामुळे सरोवराची पाण्याची पातळी वाढली आहे. 
 
{इंटरनेटवर यासंदर्भात एक नकाशा अपलोड करण्यात आला. यामुळे कालव्यात कुठे खड्डा पडला असून सध्या त्याची स्थिती किती धोकादायक आहे हे दिसतेय. संततधार पावसामुळे कालव्याची दुरुस्ती करणे कठीण जात आहे. 
{ सॅन फ्रान्सिस्को क्रॉनिकल वर्तमानपत्राच्या मते, २००९ मध्येही या कालव्याला तडा गेल्याचे वृत्त होते. पण त्यावर वेळीच उपाय करण्यात आले नाहीत. संबंधित अधिकारी संकट ओढवल्याशिवाय काही हालचाल का करत नाहीत? 
{ट्विटरवर ओरोविल धरण ट्रेंडमध्ये आहे. हायस्पीड बुलेट ट्रेनचे जाळे विस्तारण्यावर कोट्यवधी डॉलर खर्च करण्यापूर्वी सध्या अस्तित्वात असलेल्या प्रकल्पांची डागडुजी करावी, अशा सूचना नेटिझन्सनी दिल्या आहेत. }sfchronicle.com
बातम्या आणखी आहेत...