आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मल्ल्याला चार डिसेंबरपर्यंत जामीन, निरपराध असल्याचा कांगावा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - भारतातून पळालेल्या पळपुट्या विजय मल्ल्याला मंगळवारी वेस्टमिन्स्टर न्यायालयाने चार डिसेंबरपर्यंत जामीन दिला आहे. बँकांचे ९ हजार कोटी  रुपयांचे कर्ज परतफेड करण्यासंदर्भात प्रत्यार्पण प्रकरणाच्या सुनावणीसाठी मल्ल्या  न्यायालयात हजर झाला होता. एप्रिल महिन्यात अटक झाल्यानंतर ६१ वर्षीय मल्ल्या सध्या जामिनावर बाहेर आहे. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी सहा जुलै रोजी हाेणार आहे.  
 
न्यायालयात हजर होण्यासाठी मल्ल्याने स्वत:वर लावलेले सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचे सांगितले. मी निरपराध असल्याचे सांगत मल्ल्या म्हणाला की, “मी कोणत्याही न्यायालयापासून पळत नाही. मी निरपराध असल्याचे सिद्ध करण्यासाठी माझ्याकडे पुरेसे पुरावेदेखील आहेत.’ अब्जावधी रुपयांच्या कर्जाशी संबंधित प्रश्न विचारल्यावर मीडियावर रोष व्यक्त करत मल्ल्या म्हणाला की, “अब्जावधींचे तुम्ही स्वप्नच पाहत राहा. तुमच्या प्रश्नाला योग्य बनवण्यासाठी एकही तथ्य नाही. मला मीडियाला काहीही माहिती देण्याची इच्छा नाही. मी जे काही सांगेन ते मोडूनतोडून दाखवले जाईल. माझ्याकडील पुरावेच सर्व बोलतील. मी भारतीय संघाला प्रोत्साहन देण्यासाठी क्रिकेट पाहायला गेलो तरी मीडिया त्याची बातमी बनवतो. यापेक्षा मी काही न बोललेलेच बरे.’  
न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान “क्राऊन प्रॉसिक्युशन सर्व्हिस’च्या वतीने भारताची बाजू मांडण्यात आली.
बातम्या आणखी आहेत...