आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Village Suffers Biblical Non Stop Rain In England

इंग्लंडच्या या गावात 81 दिवसांपासून सतत पाऊस कोसळत आहे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - विचार करा दररोज डोळे उघडल्यावर पाऊस आणि पाऊसच दिसत असेल. झोपायला गेला तरी पाऊस चालू असेल. कार्यालयाला जायचे असेल तर पावसात जावे लागेल आणि तेथून घरी परताना पावसाची भेट होईल. खरेदीसाठी जायला मिळत नसेल आणि स्थानिक बाजारपेठ पाण्‍यामुळे बंद असेल? तसे पाहिले तर पाऊस सुखद अनुभव देऊन जातो. पण पाऊसच अडचण होत असेल तर? अशीच काहीतरी स्थिती इंग्लंडमधील एका गावाची आहे. येथे पावसाने सर्व विक्रम मोडले आहे. गावात 81 दिवसांपासून सतत पाऊस चालू आहे. परिस्थिती अशी आहे, की प्राणीही बाहेर पडायला घाबरतात, तर माणसाची गोष्‍ट निराळीच.
त्या गावाचे नाव आहे वेल्श. जिथे 26 ऑक्टोबर, 2015 पासून आतापर्यंत प्रत्येक दिवशी पाऊस चालू आहे. इतका पावसामुळे सूर्य नारायणाचे दर्शन दुर्लभ झाले आहे. थंड वातावरणाचा मारा चालू आहे. या कारणामुळे पावसाने झोडपलेले हे गाव आता आंतरराष्‍ट्रीय माध्‍यमांत जागा मिळवली आहे. शेती करणारे जॉन डेविज म्हणाले, पाऊस पूर्वीही व्हायचा; मात्र इतके दिवस कधीही नाही. माझ्या माहितीप्रमाणे पाऊस कधी पडला नव्हता. हा पण प्रत्येक वर्षी 10 दिवस सतत पाऊस होतो किंवा 30 दिवशी चालतो. मात्र यावेळी मर्यादाच ओलंडली. चक्क 81 दिवस सतत पाऊस चालू आहे.
परिस्थिती अशी आहे, की स्थानिक लोकांजवळ अन्नधान्य कमी पडले आहेत. मला ट्रकांमध्‍ये सामान भरुन शहरात आणावे लागत आहे. हे गाव केवळ 423 फुट उंचावर आहे. येथील भाग पठारी भागावर आहे. गावाच्या आसपास दाट जंगल आहे. गावकरी उपजीविकेसाठी शेती आणि पशूपालन करतात. मात्र सततच्या पावसामुळे जनावरेही बाहेर जायला घाबरत आहेत.
पुढे पाहा संबंधित छायाचित्रे...