आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनमधील पाण्‍याच्या व‍िहिरींना लागते आग, गावकरी आहेत त्रस्त

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो : विहिरीतून निघाणारे पाणी या पध्‍दतीने आग पकडत आहे.
विहिर खोदल्यावर त्यात लागणा-या पाण्‍याला आग लागत आहे. मध्‍य चीनमध्‍ये सांक्सी प्रांताच्या अन्साई गावात गावक-यांनी मोठ्याप्रमाणावर मेहनत आणि पैसे खर्च करुन विहिर खोदली. पण त्यातून येणा-या पाणी आग लवकर पकडते. गावक-यांच्या म्हणण्‍यानुसार खोदताना विहिरीतून गॅस आणि पेट्रोलचा गंध येत होता. मात्र ते असेही मानतात,की जवळच पेट्रोल स्टेशन असल्याचा परिणाम असू शकतो.

स्थानिक अधिका-यांच्या माहितीनुसार तेल विहिरी 750 ते 4 हजार 500 मीटर खोलीच्या दरम्यान असतात. यामुळे केवळ 46 मीटर खोल विहिरीत आगी सारखा प्रकार होण्‍याची शक्यता कमी असते. सध्‍या याबाबत तपास चालू आहे.

चीनमध्‍ये 70 टक्के नद्या आणि तलाव प्रदूषित
कारखान्यातून निघाणा-या घातक कचरा आणि दूषित पाण्‍यामुळे चीनची 70 टक्के नद्या आणि तलाव पूर्णपणे दूषित झाले आहेत. चीनमधील भूमीगत पाणी वापर योग्य नाही. येथे पाणी इतके प्रदूषित झाले आहे, की ते उद्योगासाठीही वापरण्‍यास योग्य नाही.

पुढील स्लाइड्सवर पाहा व‍िहिरीतून निघणा-या पाणी कशा पध्‍दतीने आग पकडते...