आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

50 वर्षांपूर्वी असे होते सिलिकॉन व्हॅली, येथे सरासरी वेतन आहे 73 लाख

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिलिकॉन व्हॅली - अमेरिकेच्या सॅन फ्रान्सिस्को बे एरियाचा भाग असलेल्या सिलिकॉन व्हॅलीमध्ये जगभरातील प्रसिद्ध आयटी कंपन्या आहेत. अॅपल, गुगल, फेसबूक, इंटेल, ओरॅकल आणि अबोडसह जगातील जवळपास सर्व मोठ्या कंपन्यांचे ऑफिसेस येथे आहेत. सिलिकॉन व्हॅली स्टार्टअप्स साठी स्वर्ग समजली जाते. अमेरिकेत जी गुंतवणूक होते त्याचा एक तृतीयांश भाग या क्षेत्रात येतो. येथे इनव्हेस्टमेंट केल्यास स्टार्टअप्सला सर्वाधिक फायदा मिळतो. सिलिकॉन व्हॅली आणि त्याला लागून असलेल्या सॅ फ्रान्सिस्कोमध्ये 30 हून अधिक लहान मोठ्या कंपन्या काम करत आहेत. येथे सरासरी वेतन 116,033 डॉलर (73 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. येथे आम्ही सिलिकॉन व्हॅलीच्या विंटेज फोटोसह येथील इतिहासाबाबत सांगणार आहोत.

स्टार्टअप्ससाठी स्वर्ग
जगात जेवढे स्टार्टअप्स याठिकाणी यशस्वी झाले आहेत तेवढे कुठेही यशस्वी झालेले नाहीत. येथे सरकारकडून मिळणापी वीज सबसिडी, स्वस्त इंटरनेट, चांगली प्रतिमा यामुले मार्केट लवकर मिळणे, गुंतवणूक अधिकाधिक होणे अशी काही कारणे आहेत. त्यामुळे येथे स्टार्टअप लवकर यशस्वी होतात. त्यामुळेच या क्षेत्रात कंपव्या वाढत गेल्या आहेत.

पुढील स्लाइड्सवर पाहा. सिलिकॉन व्हॅलीचे काही विंटेज PHOTOS