आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोहली करिअरच्या नवव्या वर्षी विस्डेनच्या मुखपृष्ठावर, 2014 मध्ये निवृत्तीनंतर होता सचिन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन- भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या यशाच्या शिरपेचात आणखी एक तुरा खोचला गेला आहे. क्रिकेटमधील बायबल म्हणून अोळख असलेल्या विस्डेन अलामनाकच्या १५४ या अंकाच्या कव्हर पेजवर कोहलीला स्थान देण्यात आले आहे. कोहलीने नुकतेच आपल्या आक्रमक नेतृत्वाच्या बळावर इंग्लंडविरुद्ध कसोटी, वनडे आणि टी-२० या तिन्ही मालिकेत विजय मिळवला होता. कोहली भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरनंतर विस्डेनच्या मुखपृष्ठावर स्थान मिळवणारा पहिला भारतीय क्रिकेटपटू आहे. सचिनला २०१४ मध्ये विस्डेन मुखपृष्ठावर स्थान मिळाले होते. यासाठी सचिनला निवृत्तीपर्यंत वाट बघावी लागली. मात्र, विराट कोहलीने करिअरच्या नवव्या वर्षीच विस्डेनच्या कव्हर पेजवर स्थान मिळवले. २०१७ च्या अंकाचे विमोचन ६ एप्रिल रोजी होईल.
  
विस्डेनचे संपादक लॉरेंस बुथ म्हणाले, ‘कोहली वर्तमानाचा प्रतीक आहे. विस्डेन जुन्या आणि परंपरागत लोकांनाच स्थान देते, असे अनेकांचे मत आहे. मात्र, आता क्रिकेट बदलत आहे, हे दाखवण्यासाठी कोहलीच योग्य व्यक्ती आहे.’ असे असले तरीही कोहली अद्याप एकदाही विस्डेनच्या टॉप-५ क्रिकेटपटूंच्या यादीत सामील झाला नाही. या सत्रात ज्यांनी इंग्लंडमध्ये शानदार प्रदर्शन केले आहे, त्यांचा या टॉप-५ मध्ये समावेश होतो. कोहली दोन वेळा इंग्लंडमध्ये मालिकेत खेळला. मात्र, दोन्ही वेळा त्याचे प्रदर्शन साधारण होते. यामुळे तो टॉप-५ मध्ये आला नाही.

२००३ पासून क्रिकेटपटूंचे फोटो 
- विस्डेनचे प्रकाशन १९६४ पासून सुरू झाले. जॉन विस्डेन नावाच्या इंग्लिश क्रिकेटपटूने याची सुरुवात केली.  
- ब्रिटिश कांदबरीकार अॅलन वॉने याला पहिल्यांदा क्रिकेटचे बायबल म्हटले.  
 १९३८ मध्ये ७५ व्या अावृत्तीपासून याचे कव्हर पेज पिवळ्या रंगात निघू लागले. त्याआधी कव्हर पेजचे रंग निश्चित नव्हते.  
- १९३८ पासून कव्हर पेजवर दोन क्रिकेटपटूंचे (एक फलंदाज, एक यष्टिरक्षक) स्केच एकत्र झळकू लागले.  
- २००३ पासून कव्हर पेजवर खेळाडूचे खरे फोटो लागण्यास सुरुवात झाली.   
- सचिन तेंडुलकर (२०१४) या कव्हर पेजवर झळकणारा पहिला भारतीय बनला.

चार वर्षांत तीन वेळा आशियाई
मागच्या चार वर्षांत तीन वेळा याच्या कव्हर पेजवर मूळ आशियाई असलेल्या व्यक्तीचे फोटो झळकले. २०१४ मध्ये सचिन, २०१७ मध्ये कोहली तर २०१५ मध्ये इंग्लंडच्या मोईन अलीचा फोटो झळकला. इंग्लंडकडून खेळणारा मोईन मूळ पाकिस्तानी आहे.

६ एप्रिलला अंक प्रकाशित होणार
‘विस्डेन’चा २०१७ चा अंक ६ एप्रिल रोजी प्रकाशित होईल. कव्हर पेजवर कोहली असल्याचे ‘विस्डेन’इंडियाने टि्वट करून सांगितले.
बातम्या आणखी आहेत...