आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIRAL VIDEO : चर्चमध्ये चमत्कार, जेव्हा बोलू लागले मदर मेरीचे पेंटींग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऑस्ट्रेलियाच्या सिडनीमधील सेंट चार्बेल चर्चमध्ये प्रार्थनेदरम्यान घडलेला प्रसंग याठिकाणी असलेले लोक कधीही विसरू शकणार नाहीत. सिडनीच्या दक्षिण-पश्चिमेला असलेल्या या चर्चमध्ये रोज प्रार्थनेसाठी येणा-या दोन तरुणांनी मदर मेरीच्या पेंटींदमधील ओठ हलताना पाहिले आणि त्याचे कॅमे-यात रेकॉर्डींग करून घेतले. चर्चच्या ऑल्टरमध्ये असलेले हे पेंटींग मदर मेरी आणि त्यांच्या कुशीत असलेल्या बाल येशूचे आहे.

काय आहे व्हिडिओमध्ये...
चर्चमध्ये मिडल ईस्टर्न कॅथलिक पेंटिंगमध्ये मदर मेरीचे ओठ प्रार्थनेदरम्यान हलताना दिसून आले. जेव्हा लोक प्रार्थना करत होते, तेव्हा पेंटींगमध्ये मेरीही प्रार्थना म्हणत असल्याचे दिसत होते. क्रिस्टन कॅरॉज नावाच्या एका मुलीने सांगितले की, ती प्रार्थनेसाठी हजर होती. त्याचवेळी तिच्या मित्रांनी तिला पेंटींग दाखवले. ते पाहताच तिल्ला धक्काच बसला. पेंटिंगमध्ये मेरीही प्रार्थना म्हणत असल्याचे दिसत होते. तिने तो चमत्कार असल्याचे समजत त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि फेसबूकवर अपलोड केला.
व्हिडिओबाबत लोकांच्या संमित्र प्रतिक्रिया आल्या आहेत. यावर विश्वास ठेवणारे याला चमत्कार समजत आहेत. तर काही जण कॅमेरा हलल्यामुळे असे दिसत असल्याचे म्हटले आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, मदर मेरीचे Painting