आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहा महिन्यांपूर्वी व्हर्जिन ग्रुपचे चेअरमन रिचर्ड ब्रँसन यांना फसवण्याचा प्रयत्न झाला होता

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन- लंडनच्या ठकांनी लोकांना फसवण्याची  अनोखी पद्धत अवलंबली आहे. ‘मी ब्रिटनचा संरक्षणमंत्री बोलतोय. एका मुत्सद्याचे अपहरण झाले आहे. त्याच्या सुटकेसाठी खंडणी  देण्यासाठी मदत करावी,’ असे हे ठक फोनवर सांगतात. व्हर्जिन ग्रुपचे संस्थापक व चेअरमन रिचर्ड ब्रँसन यांच्याबाबत असा प्रकार समोर आल्यानंतर त्यांनी वस्तुस्थिती समजून घेतली. त्यांना जाळ्यात ओढण्याचा प्रकार सहा महिन्यांपूर्वी घडला होता. मात्र, आता त्यांचेच नाव घेऊन एका मित्राला १३ कोटींना फसवल्याचे स्पष्ट झाले. यानंतर रिचर्ड यांनी फसवणूक झाल्याचा अनुभव शेअर केला... 
 
ब्रँसन यांची ब्रिटनच्या संरक्षणमंत्र्यांच्या नावे बाेलून फसवणूक 
सहा महिन्यांपूर्वी माझ्या सहायकाकडे संरक्षण मंत्रालयाकडून पत्र आले. माझ्याशी बोलण्याची इच्छा असल्याचे त्यात लिहिले होते. मी फोन केला. समोरून आवाज आला, मी ब्रिटनचा संरक्षणमंत्री माकेल फॅलोन बोलतोय. आमच्या एका मुत्सद्द्याचे अतिरेक्यांनी अपहरण केले असून खंडणीची मागणी करत आहेत. ब्रिटिश कायदा खंडणी देण्याच्या विरोधात आहे. मात्र, प्रकरण संवेदनशील आहे. खंडणी देणे हा एकमेव पर्याय आहे. त्यांनी मला ३० कोटी रुपयांची मदत करण्यास सांगितले व  सरकार लवकरच पैसे परत करणार असल्याचे म्हटले. फोनवर बोलणाऱ्याची शैली फॅलोनसारखीच होती. दुसऱ्या दिवशी वकिलाला सचिवालयात पाठवले. फॅलोन यांनी कुणाचे अपहरण झाले नसल्याचे सांगितले. कोणीतरी फसवण्याचा प्रयत्न केल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. काही दिवसांपूर्वी एका मित्राचा ई-मेल आला. तो अमेरिकेत व्यावसायिक आहे.त्याने ई-मेलमध्ये लिहिले की,  रिचर्ड तुम्ही माझ्याकडून १३ कोटी रुपये उसने घेतले होते व दोन आठवड्यांत परत करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, आता तीन आठवडे उलटले आहेत. पैसे घेतल्याचे नाकारल्यानंतर  संबंधिताला माझा कार्यालयीन ई-मेल व फोन कॉलही मिळाला होता. संरक्षण मंत्र्याचे नाव घेऊन फसवणूक करण्याचा जसा प्रयत्न झाला तसाच तो माझे नाव घेऊन मित्राची फसवणूक झाल्याचे लक्षात आले. 
 
बातम्या आणखी आहेत...