आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विश्व मराठी साहित्य संमेलन: अानंदी जीवनामध्ये साहित्याचा वाटा माेलाचा - ल्युंपो पाैडेल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
थिम्पू (भूतान) - जीवनात अानंद महत्त्वाचा असून त्यामध्ये साहित्याचा वाटा माेलाचा अाहे. कारण प्रेम अाणि अादराबराेबरच सामाजिक भानदेखील साहित्याद्वारे मिळत असते, असे प्रतिपादन भूतानचे माजी शिक्षणमंत्री ल्युंपाे ठाकूरसिंग पाैडेल यांनी केले. येथे अायाेजित सहाव्या विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बाेलत हाेते. व्यासपीठावर संमेलनाध्यक्ष संजय अावटे, उद्घाटक हरी नरके, स्वागताध्यक्ष कॅप्टन नीलेश गायकवाड, प्रमुख संयाेजक संदीप कडवे उपस्थित हाेते.

भूतानची राजधानी थिम्पू येथे ग्रंथदिंडी काढून संमेलनाला प्रारंभ झाला. पौडेल यांनी भूतान हा अानंदी लाेकांचा देश म्हणून कसा नावारूपाला अाला हे सांगताना ‘ग्राॅस हॅपिनेस इंडेक्स’ची संकल्पना स्पष्ट केली. जीवनात समाधान अाणि अानंद सर्वाधिक महत्त्वाचा असून त्यासाठी भाषेतील साहित्यकृती अापल्याला माेलाचे याेगदान देत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
संमेलनाध्यक्ष संजय अावटे म्हणाले की, सध्या जगभर बदलाचे वारे वाहत आहेत. मात्र दुसरीकडे जगभर विकार अाणि विद्वेष यांचीही वाढ हाेत अाहे. म्हणूनच जग एकमेकांशी जाेडण्यासाठी साहित्य अाणि माध्यमे महत्त्वाची भूमिका बजावतात. याबराेबच सध्या नव माध्यमांमुळेही सामान्य माणसाला आवाज मिळून जग जवळ अाले अाहे.

नरके म्हणाले की, जी भाषा राेजगार देते तीच टिकते. म्हणूनच मराठी भाषेलाही अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी सर्वच दृष्टीने प्रयत्न सुरू अाहेत. लवकरच मराठीला अधिकृतरित्या अभिजात भाषेचा दर्जा मिळेल.

त्यानंतर मराठी भाषेच्या विकासासाठी, वृद्धीसाठी केंद्र शासनाकडून ५०० काेटी रुपयांचे अनुदान मिळेल. त्यातूनच मराठी साहित्य, शिष्यवृत्ती, ग्रंथालये तसेच विविध भाषांतील ज्ञान मरांी भाषांत अाणण्याचे काम जाेमाने सुरु हाेईल अाणि मराठी भाषेचा विकास हाेेत राहील.
शिवसंघ प्रतिष्ठानचे अध्यक्ष अाणि संमेलनाचे स्वागताध्यक्ष कॅप्टन नीलेश गायकवाड यांनी संमेलनामागील भूमिका स्पष्ट केली. काेणतीही भाषा ज्ञानभाषा झाली तरच ती टिकते अाणि वाढते. पण ती भाषा ही साहित्यापुरतीच मर्यादित राहू नये ,हे संमेलन भरविणे हा याचाच एक भाग असल्याचे त्यांनी व्यक्त केले. प्रमाेद गायकवाड यांनी अाभार मानले तर सूत्रसंचालन अरुंधती सुभाष यांनी केले.

माध्यमे विषयावर रंगला परिसंवाद
या साहित्य संमेलनाचा विषयच माध्यमे असा होता. या परिसंवादाची सूत्रे ‘दिव्य मराठी’चे डेप्युटी एडिटर अभिजित कुलकर्णी यांच्याकडे होती. परिसंवादात प्रसाद पिंपळखरे, चंद्रकांत शहासने, दुबई येथील महाराष्ट्र मंडलाचे अध्यक्ष संदीप कडवे, सिंगापूर येथील उद्योजक राजेंद्र धर्माधिकारी आणि पत्रकार सुशांत सांगवे यांनी सहभाग घेतला. त्यातून विविध माध्यमांचा वेध घेण्यात आला.
छायाचित्र: साहित्य दिंडीप्रसंगी संमेलनाध्यक्ष संजय आवटे, उद्घाटक हरी नरके, स्वागताध्यक्ष नीलेश गायकवाड, प्रमुख संयोजक प्रमोद गायकवाड आदी.
बातम्या आणखी आहेत...