आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vladimir Putin Called For Sanctions Against Turkey

‘आगीशी खेळू नका!’ तुर्कीच्‍या राष्ट्राध्यक्षांनी दिला रशियाला इशारा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंकारा / मॉस्को / वॉशिंग्टन - तुर्की आणि रशियातील तणाव आणखी वाढू लागला आहे. त्यात अमेरिकाही सहभागी होत आहे. तुर्कीला अमेरिकेने विमानाची माहिती दिली होती, असे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी शुक्रवारी म्हटले होते. परंतु अमेरिकेने हा आरोप फेटाळून लावला. दरम्यान, ‘आगीशी खेळू नका ’ असा इशारा तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष तय्यिप अर्दोगन यांनी शनिवारी दिला आहे.
रशियाने सिरियात तुर्कीच्या सीमेजवळ अत्याधुनिक क्षेपणास्त्र प्रणाली एस-४०० तैनात केली आहे. त्याचबरोबर सागरी क्षेत्रातही युद्धनौका तैनात केली आहे. रशियाने तुर्कीवर आर्थिक निर्बंध लागू करण्यात येत असल्याचे जाहीर केले आहे. तुर्कीकडे जाणाऱ्या ट्रकला रोखण्यात आले आहे. अर्दोगन शनिवारी म्हणाले, रशिया भावनिक धमकी देऊ लागला आहे. खरे तर आम्ही रशियासोबतच्या संबंधाला खूप महत्त्व देतो. परंतु त्याची आता गरज उरलेली नाही. अर्दोगन बेबुर्त येथील सभेत ते बोलत होते. रशियाच्या कनिष्ठ सभागृहातील सभापती सर्गेई नारिश्किन यांनी मात्र या मुद्द्यावर चिथावणीखोर वक्तव्य केले. तुर्कीवर लष्करी कारवाई करण्याचा रशियाला अधिकार आहे. कारण तुर्कीने आपल्या सैनिकांची जाणूनबुजून हत्या केली आहे. रशियातील चौथा मोठा पक्ष लिबरल डेमोक्रॅटिक पार्टीचे नेते व्लादिमीर झिरीनोव्स्की यांनी तुर्कीवर अणुबॉम्ब टाका, असे वक्तव्य केले.दरम्यान, रशियाला अमेरिकेवर संशय आहे. त्याचबरोबर इस्लामिक स्टेट विरोधात आघाडीसाठी रशियाला मोठी लष्करी आघाडी सुरू करण्यासाठी अमेरिकेची मदत घ्यावी लागणार आहे.