आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संसदेच्या निवडणुकीमध्ये पुतिन यांना प्रचंड बहुमत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मॉस्को - रशियातील संसदेच्या निवडणुकीत अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या सत्ताधारी युनायटेड रशिया पक्षाला मोठे बहुमत मिळाले आहे. त्यामुळे २०१८ च्या निवडणुकीत अध्यक्षपद निवडणुकीसाठी उभे राहण्याचा पुतिन यांचा मार्ग सुकर झाल्याचे मानले जात आहे.
रशियन संसदेचे कनिष्ठ सभागृह असलेल्या ‘डुमा’च्या ४५० जागांसाठी रविवारी मतदान झाले होते. सुमारे ९३ टक्के मतमोजणी झाल्यानंतर पुतिन यांच्या सत्ताधारी युनायटेड रशिया पक्षाला ५४.३ टक्के मते मिळाली होती. त्यानुसार पक्षाला ४५० पैकी किमान ३४३ जागा मिळतील, असे चित्र आहे. हे घटनात्मक बहुमत आहे. गेल्या निवडणुकीत या पक्षाला २३८ जागा मिळाल्या होत्या. कम्युनिस्ट पक्षाला १३.५ टक्के, अल्ट्रानॅशनल पक्षाला १३.२ टक्के तर अ जस्ट रशिया पक्षाला ६.२ टक्के मते मिळाल्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या निकालांवरून दिसते. याब्लोकोव्ह पार्टी आणि माजी पंतप्रधान मिखाइल कास्यानोव्ह यांच्या परनास पार्टीला पुरेशी मते मिळालीच नाहीत. त्यामुळे त्यांना एकही जागा मिळणार नाही, असे दिसते. मात्र या वेळी मतदान ५० टक्क्यांपेक्षाही कमी झाल्याने पुतिन यांच्या धोरणांना फारसा पाठिंबा नाही, असे दिसत आहे. कास्यानोव्ह यांनीही याबाबत चिंता व्यक्त केली.

आमच्या बाजूनेच मतदान : पुतिन
आमच्या पक्षाला चांगला विजय मिळाला आहे, असे आम्ही म्हणू शकतो. परिस्थिती खूप कठीण होती, पण तरीही देशातील नागरिकांना युनायटेड रशिया पक्षाच्या बाजूनेच मतदान केले, अशी प्रतिक्रिया पुतिन यांनी सरकारी दूरचित्रवाणीवर व्यक्त केली.
बातम्या आणखी आहेत...