आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिस-या महायुद्धाचा धोका: परदेशात राहणा-या लोकांना देशात बोलवून घ्या- पुतिन यांचे आदेश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रशियाला व राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतिन यांना तिस-या महायुद्धाची सध्या भीती वाटतेय. - Divya Marathi
रशियाला व राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतिन यांना तिस-या महायुद्धाची सध्या भीती वाटतेय.
मास्को- रशियाला तिस-या महायुद्धाची सध्या भीती वाटतेय. रशियाने आपल्या सर्व स्टाफला सूचना दिल्या आहेत की, परदेशात राहणा-या आपल्या जवळच्या लोकांना, रशियन नागरिकांना आपल्या देशात तत्काळ बोलवून घ्या. स्थानिक मीडियाच्या माहितीनुसार, देशातील सर्व मोठ्या नेत्यांनी आणि उच्चपदस्थ अधिका-यांनी सांगितले की, राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतिन यांनीच हे आदेश दिले आहेत. हे आदेश सुद्धा पुतिन यांच्या कार्यालयातून मिळाले आहेत. सीरिया बनतोय तिस-या महायुद्धाचे कारण...
- रशियन वेबसाईट Znak.com च्या वृत्तानुसार, पुतिन यांनी हे पाऊल त्यांनी आपला फ्रान्सचा दौरा रद्द केल्यानंतर उचलले आहे.
- सीरियात पेटलेल्या हिंसेबाबत रशियाच्या भूमिकेबाबत जोरदार टीका झाल्यानंतर पुतिन यांनी हा दौरा रद्द केला आहे. ते पुढील आठवड्यात पॅरिस येथे जाणारा होते.
- फ्रान्चे राष्ट्राध्यक्ष फ्रान्सेस ओलांद यांनी नुकतेच म्हटले आहे की, क्रेमलिन सीरियात युद्धजन्य स्थिती आहे.
- याबाबत बोलले जात आहे की, ओलांद यांच्या या वक्तव्यानंतरच पुतिनने फ्रान्स दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता.
- असेही वृत्त आहे की, रशियाने पोलंडच्या मदतीने सीमेवर न्यूक्लियर कॅपेबल मिसाईल्स तैनात केली आहेत.
- या महिन्याच्या सुरूवातीला पुतिन यांच्या सरकारमधील एका जबाबदार मंत्र्याने घोषणा केली होती की, त्यांनी राजधानी मास्कोत 12 लाख लोकांना सुरक्षित ठेवण्यासाठी न्यूक्लियर बंकर बनवली आहेत.
- माजी रशियन नेते मिखाईल गोर्बाच्येव यांनी म्हटले आहे की, रशिया आणि अमेरिकेतील यांच्यातील तणावपूर्ण स्थितीने जग एका धोकादायक वळणावर पोहचल्याचे म्हटले आहे.
रशिया- अमेरिका चर्चा फिसकटल्याने पुतिन यांना भीती-
- सीरियामधील शस्त्रसंधीसंदर्भात दिलेले आश्‍वासन रशिया पाळू न शकल्याने यासंदर्भातील रशियाबरोबरील चर्चा रद्द करत असल्याची घोषणा अमेरिकेकडून करण्यात आली आहे.
- सीरियातील नागरिकांवर होणाऱ्या हल्ल्यांसंदर्भात अमेरिकेकडून सीरियन अध्यक्ष बाशर अल असद व रशियावर टीकाही करण्यात आली.
- सीरियातील अलेप्पो या महत्त्वपूर्ण शहरावर रशियाकडून होणारी बॉंबफेक थांबविण्यात आली नाही; तर चर्चा थांबविण्यात येईल, असा इशारा अमेरिककडून गेल्या आठवड्यात देण्यात आला होता.
- अमेरिकेच्या या निर्णयामुळे वाईट वाटल्याची प्रतिक्रिया रशियाकडून व्यक्त करण्यात आली होती.
- दोन आठवड्यांपूर्वी सीरियातील शस्त्रसंधी संपुष्टात आल्यानंतर उत्तर सीरियामधील सर्वांत मोठे शहर असलेल्या अलेप्पोवर प्रचंड बॉंबफेक झाली आहे.
- या नव्या संघर्षा शेकडो नागरिक ठार झाले असून पूर्व अलेप्पोमध्ये सुमारे अडीच लाख नागरिक अडकले आहेत.
- सीरियाच्या पेचप्रसंगावर अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा व रशियाचे समपदस्थ व्लादिमीर पुतिन यांची चर्चा झाली.
- पण त्यात सीरियाचे अध्यक्ष बशर अल असाद यांच्या आगामी काळातील भूमिकेबाबत काहीच स्पष्ट भूमिका घेण्यात आली नाही.
- संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत ओबामा यांनी सीरियाचे नेते बशर अल असाद हे मुले, महिला यांना ठार मारणारे रक्तपिपासू नेते आहेत असे सांगितले होते.
- तर रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी, इसिसविरोधात असाद यांना पाठिंबा देणे गरजेचे असल्याचे सांगितले.

रशियाचे अमेरिकेकडे बोट-
- सीरियाच्या मुद्यावर अमेरिका कोणत्याही एका मुद्यावर लक्ष केंद्रीत करत नसल्याचा रशियाचा आरोप आहे.
- सीरियात आतापर्यंत तोडगा न निघण्याचे हेच सर्वात मोठे कारण आहे, आपण या मुद्यावर अमेरिकेशी वाद करू इच्छित नाही, असे रशियाचे म्हणणे आहे.
- सीरियात कोण मजबूत आहे आणि कोण कमजोर याचा कोणताही अर्थ नाही. तसेच तेथे नेतृत्व कोण करणार याचीही समस्या नाही.
- तेथे समस्येचे निराकारण न होण्याचे कारण अमेरिका कोणत्याही एका मुद्यावर केंद्रीत नाही हे आहे. याचमुळे सीरियाच्या समस्येचे अजूनही निराकरण होऊ शकलेले नाही, असे रशियाचे म्हणणे आहे.
- सीरियात काही जण लष्कर किंवा काही गट आणि पक्ष किंवा कोणत्याही एकाचे समर्थन करत आहेत. आपण या समस्येच्या निराकरणासाठी एकाच पर्यायाला समर्थन देत आहोत.
- दुसरीकडे काही जण त्यांना वाचविण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यांच्या विचारांचे देखील समर्थन करत आले आहेत.
- सीरियाच्या स्थितीवर विचार करण्याची गरज आहे. अमेरिका दोन्ही देशांदरम्यान झालेला करार पूर्ण करण्यास असमर्थ राहिला असल्याचा दावा रशियाकडून करण्यात आला.
बातम्या आणखी आहेत...