आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vladimir Putin Secretly The World\'s Richest Man

पुतीन जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती... त्यांच्या नावे 13 लाख कोटींची संपत्ती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रशियाचे राष्‍ट्रपती व्लादिमिर पुतीन. - Divya Marathi
रशियाचे राष्‍ट्रपती व्लादिमिर पुतीन.
मॉस्को - रशियाचे राष्‍ट्रपती व्लादिमीर पुतीन जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. क्रेमलिनमधील अंतर्गत सूत्रांनुसार, पुतीन यांची एकूण संपत्ती 13 लाख कोटी(140 बिलियन पाऊंड) आहे. अमेरिकेच्या वित्त विभागाने पुतीन यांच्यावर भ्रष्‍टाचाराचा आरोप केला होता.

काय आहे 13 लाख कोटींच्या संपत्तीत?
- पुतीन यांनी एप्रिल 2014 मध्‍ये आपले वार्षिक उत्पन्न 75 लाख रुपये(7.65 मिलियन रुबल) असल्याचे जाहीर केले होते. त्यांच्या म्हणण्‍यानुसार ते दोन अपार्टमेंट्स आणि एक कार पार्किंग गॅरेजचे मालक आहेत.
- अमेरिकन सरकारने 2014 मध्‍ये क्रेमलिनवर अनेक खटले दाखले केले आहे. त्यांचा आरोप आहे, की ऊर्जा क्षेत्रात पुतीन यांचे छुपी गुंतवणूक आहे.
- ब्रिटनचे प्रसिध्‍द रशियन आणि चेलेसा फुटबॉल क्लबचे मालक रोमन अब्रामोविचने पुतीनला 3 कोटी 50 लाख रुपयांचे एक याटही भेट म्हणून दिले आहे. 57 मीटर लांब लक्झरियस याटचे नाव ओलंपिया आहे.
- पुतीन यांच्याकडे अनेक महागड्या घड्याळांचा संग्रह आहे. त्यांची एकूण किंमत 4 लाख 50 हजार पाऊंड आहे. 2009 मध्‍ये त्यांनी 5 हजार 500 पाऊंड किंमतीचे ब्लाँकपेन घड्याळ एका कारखान्याच्या कामगाराला भेट म्हणून दिली होते.
- राजकीय तज्ज्ञ स्टेन्सले बेल्कोवस्की यांनी सांगितले, की तीन मोठ्या रशियन ऊर्जा कंपन्यांमध्‍ये पुतीन यांची समभाग आहेत. त्यांची किंमत 27 बिलियन पाऊंड आहे. सर्गुनेतेगाज, गॅजप्रॉम आणि गुनवोर या तेल व्यावसायिक कंपन्या आहेत.

पुढे वाचा.. फक्त 13 वर्षांत बिल गेट्सपेक्षा दुप्पट झाली पुतीन यांची संपत्ती