आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुतीन यांचे दोन लक्झरीयस जेट, पंचतारांकित हॉटेलही वाटेल क्षुल्लक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रशियाचे राष्‍ट्राध्‍यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी 930 कोटी रुपयांचे दोन लक्झयर्स जेट खरेदी केले आहे. पुतीन यांच्या या नव्या जेटच्या अंतर्गत फोटोज मागील दिवसांत इंटरनेटवर लीक झाली. यामुळे रशियन नागरिक नाराज झाले आहेत. देश आर्थिक संकटात सापडलेला असताना राष्‍ट्राध्‍यक्षांनी स्वत:च्या ऐषोरामासाठी जेट खरेदी केले आहेत.युक्रेनमध्‍ये फुटीरवाद्यांना पाठिंबा देत असल्याने पाश्‍चात्त्य देशांनी रशियावर आर्थिक निर्बंध लादल्याने तो पूर्ण कर्जात बुडालेला आहे.
रशियाचे स्वयं घोषित बादशाहने स्वत: ला जेटची भेट दिली आहे, असे जेटची छायाचित्रे सर्वात प्रथम पोस्‍ट करणारा ब्लॉगर कुंगूरोवने लिहिले आहे. जेटमध्‍ये पंचतारांकित सुविधा आहेत. त्यात लेदरच्या खुर्च्या, किंग साइज बेड, किचन, जिम आणि कॉन्फीरन्स रुम आदींचा समावेश आहे. प्रत्येक भिंत ही चित्रांनी सजावली आहे.

पहिले विमान आयएल-96-300 जेट आहे. त्याची किंमत 400 कोटी रुपये इतकी आहे. दुसरे विमान आयएल-96-300 पीयू. याची किंमत 569 कोटी रुपये इतकी आहे. परंतु सध्‍या दोन्ही विमाने तयार नाहीत. या वर्षाच्या शेवटी जेट प्रवासासाठी सज्ज होतील, अशी वर्तवली जात आहे.

पुढे पाहा, पुतीनच्या दोन नव्या लक्झरीयस जेटचे फोटोज...