आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फोक्सवॅगन महाराष्ट्रातील विस्तार वाढवणार, हॅनोव्हर मेळाव्यात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हॅनोव्हर - वाहननिर्मिती उद्योगातील आघाडीच्या फोक्सवॅगन या समूहाने महाराष्ट्रात आणखी विस्तार करण्याचे ठरवले आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची या समूहाशी झालेली चर्चा यशस्वी ठरली आहे.

फोटो - एसएएबी या संरक्षणविषयक साहित्याची निर्मिती करणाऱ्या उद्योगसमूहाला दिलेल्या भेटीदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

हॅनोव्हर येथील व्यापार-औद्योगिक मेळाव्यातील मुख्यमंत्र्यांचे "मिशन महाराष्ट्र' अभियान वेगाने राबवले जात आहे. त्याला जर्मन उद्योगसमूहांकडून उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत आहे. मुख्यमंत्र्यांनी फोक्सवॅगनच्या संचालक मंडळाशी विस्ताराने चर्चा केली. फोक्सवॅगन हा वाहननिर्मिती उद्योगातील एक आघाडीचा समूह असून जागतिक पातळीवर आपल्या विस्तारात या समूहाने भारतातील निर्मिती केंद्रांना अधिक प्राधान्य दिले आहे. त्यामुळे या समूहाशी चर्चेबाबत अधिक औत्सुक्य होते.

महाराष्ट्र सरकारच्या वतीने फोक्सवॅगनशी झालेली चर्चा यशस्वी ठरली आहे. फोक्सवॅगनसाठी लागणाऱ्या अनेक सुट्या भागांचे उत्पादन भारतात लहान आणि मध्यम उद्योजकांच्या माध्यमातून व्हावे हा या बैठकीचा मुख्य उद्देश होता. राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या (आयटीआय) माध्यमातून फोक्सवॅगनने प्रशिक्षित मनुष्यबळाची निर्मिती करावी, ही सरकारची विनंती समूहाच्या संचालक मंडळातील ज्येष्ठ सदस्य थॉमस उल्ब्रिच यांनी मान्य केली आहे. या चर्चेत थिसनक्रप, डव्वा, कुका रोबोटिक्स, वोको आदी उद्योगसमूहांच्या प्रतिनिधींचा समावेश होता. या कंपन्यांच्या गुंतवणुकीतील विविध पातळ्यांवर येणारे अडथळे तातडीने दूर केले जातील.