इंटरनॅशनल डेस्क- इराकमधील 'वादी-अल-सलाम' ही दफनभमी जगातील सर्वात मोठी दफनभूमी आहे. नजफ शहराजवळ असलेली ही दफनभूमी पीस व्हॅली नावाने प्रसिद्ध आहे. दहशतवाद्यांचा खासकरून ISIS चा गड मानल्या गेलेल्या या देशात एवढे हल्ले होत होते की, येथे दररोज सुमारे 200 मृतदेहाचा दफनविधी केला जायचा. माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, या पीस व्हॅलीत आतापर्यंत किमान 50 लाखांहून अधिक डेड बॉडीज दफन केल्या आहेत. इसिसमुळे दुप्पट झाली संख्या...
- दहशतवाद्यांचा खासकरून ISIS चा गड मानल्या गेलेल्या या भागात दररोज सुमारे 200 मृतदेहाचा दफनविधी केला जायचा.
- हे सर्व मृतदेह याच दफनभूमीत पुरले जायचे. जेव्हा येथे दहशतवादी कारवाया होत नव्हत्या तेव्हाही येथे 80 ते 100 डेड बॉडीज पुरल्या जायच्या.
- मात्र, दहशतवादी हल्ल्यामुळे हा आकडा वाढून तो 200 वर गेला होता. मात्र, मागील काही दिवसात हा आकडा पुन्हा खाली आला आहे.
- इसिसच्या दहशतवादानंतर येथे मरणा-या लोकांची दुप्पट झाली होती.
- ही दफनभूमी पाहायला दरवर्षी लाखो लोक येत असतात. या दफनभूमीत मकबरा सुद्धा बनवला आहे. इसिसशी लढण्यापूर्वी सैनिक येथे माथा ठेकवून जायचे.
- हे सैनिक किंवा लोक माथा यासाठी येथे ठेकवायचे की, जर युद्धात मरण आले तर मला याच ठिकाणी दफन करावे अशी मन्नत मागायचे.
जगभरातील शिया मुस्लिमांची पहिली पसंत-
- ही दफनभूमी 1 हजार 485 एकर जमिनीवर पसरली आहे. जवळपास 1400 वर्षांपासून येथे बॉडीज दफन केल्या जातात.
- या दफनभूमीत शिया धर्माचे पहिले इमाम अली इब्न अबी तालिब यांची डेड बॉडीज येथे दफन केली होती.
- त्याच्या प्रार्थनास्थळावर त्यांचे लाखो अनुयायी येथे माथा टेकवतात.
- एवढेच नव्हे तर याच दफनभूमीत आपल्याला दफन करावे अशी प्रत्येक शिया समुदायातील लोकांची इच्छा असते.
- नजफ शहरातील या पीस व्हॅलीत आतापर्यंत किमान 50 लाखांहून अधिक डेड बॉडीज दफन केल्या आहेत.
- येथे बनवलेल्या समाधी (कब्र) विटा, प्लॅस्टर आणि कॅलिग्राफीने सजवल्या जातात. ज्याची जितकी ऐपत त्यानुसार ती जागा सजवली जाते.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, जगातील सर्वात मोठी दफनभूमीचे आणखी काही फोटोज...