आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या वेटरेसेसने ज्येष्ठ ग्राहकाला डोनेट केली किडनी, माणुसकीचे मुर्तिमंत उदाहरण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रोलवेल (अमेरिका)- एक वेटर आणि कस्टमरचे नाते केवळ ऑर्डर देणे आणि ती पूर्ण करणे एवढेच असते. काही कस्टमर याच्या पुढे जात वेटरला टिप किंवा शाबासकी देतात. पण एका वेटरेसेसने कस्टमरसाठी माणुसकीचे मुर्तिमंत उदाहरण घालून दिले आहे.
जॉर्जिया रोसवेल येथील मारियाना व्हिलारियल ही तरुणी हुटर्स नावाच्या एका रेस्तरॉंत वेटरेसेस आहे. गेल्या 10 वर्षांपासून डॉन थॉमस या रेस्तरॉंत नियमित येत होते. पण गेल्या महिन्याभरापासून ते या रेस्तरॉंत आले नाही. मारियानाला ही गोष्ट जरा खटकली. त्यानंतर जेव्हा डॉन रेस्तरॉंत आले तेव्हा तिने त्यांना याबाबत विचारणा केली.
ती म्हणाली, की आजकाल तुम्ही रोज रेस्तरॉंत येत नाहीत. तेव्हा डॉन यांनी सांगितले, की त्यांना एका वेगळ्या प्रकारचा कॅन्सर आहे. यामुळे त्यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या आहेत. डॉक्टरांनी केवळ एका महिन्याची मुदत दिली आहे. पण अमेरिकेत किडनी डोनर रजिस्ट्रीची लिस्ट लांब आहे. त्यामुळे लगेच किडनी मिळणार नाही.
दोन वर्षांपूर्वी याच कारणाने माझ्या पत्नीचा मृत्यू झाला. त्यानंतर मारियानाने तिची वैद्यकिय चाचणी केली. तेव्हा समजले, की ती किडनी दान देऊ शकते. त्यांच्या किडन्या मॅच होतात. काही दिवसांपूर्वी डॉक्टरांनी मारियानाची किडनी काढून डॉन यांना बसवली. त्यामुळे जॉनला किमान दोन वर्षांचे अतिरिक्त आयुष्य मिळाले आहे.
याबाबत फेसबुकवर लिहिताना मारियानाने सांगितले, की काही वर्षांपूर्वी माझ्या आजीचा मृत्यू किडनी निकामी झाल्याने झाला. त्यावेळी मी त्यांची कोणतीही मदत करु शकले नाही. मला माहित आहे, आपल्या लोकांना गमावण्याचे दुःख काय असते. डॉक्टर म्हणाले आहेत, की डॉन आणखी दोन वर्षे जगतील. पण मला देवावर पूर्ण विश्वास आहे. ते त्याच्यापेक्षा जास्त जगतील.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, किडनी बसविल्यावर दोघांनी अशी दिली पोज...