आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • War Over Instagram Between Drug Mafia To Show Luxurious Life

इन्स्टाग्रामवर ड्रग माफिया वॉर! Luxurious Life दाखवण्याचा आटापिटा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इन्स्टाग्राम हे यूझर्सना त्यांच्या जीवनाशी संबंधित बाबी शेअर करण्यासाठी एक चांगले प्लॅटफॉर्म आहे. मग वर्कआऊटनंतर मसल्स दाखवायचे असोत की नव्या कारचे फोटो शेअर करायचे असो. रिच किड्स ऑफ इंस्टाग्राम हे याचे अत्यंत चांगले उदाहरण आहे. पण मेक्सिकन ड्रग कार्टल्स या सर्वामध्ये बरेच पुढे निघून गेले आहेत. इन्स्टाग्रामवर हे फोटो मेक्सिकन ड्रग कार्टलच्या मेंबर्सने शेअर केले आहेत.

इंस्टाग्रामचा सर्वात मोठा 'नार्को किंग' कोण? यावरून सध्या ड्रग माफियांमध्ये डिजिटल वॉर सुरू आहे. इन्स्टाग्रामवर narcos आणि narcostyle हॅशटॅगच्या फोटोंचा जणू पूर आला आहे. या हॅशटॅगद्वारे ड्रग लॉर्ड्सनी गोल्ड प्लेटेड गन-एके-47, सुपरकार्स आणि लक्झरी लाइफसह त्यांच्या वाघ आणि सिंहांचे फोटो शेअर केले आहेत.

असा सुरू झाला हॅशटॅग
या हॅशटॅघची सुरुवात जगातील सर्वात शक्तीशाली ड्रग माफिया एल चापो गूजमॅनच्या मुलांनी केली असे मानले जाते. एल चापोचा मुलगा इव्हान गूजमॅन, अल्फ्रेडो गूजमॅन आणि मेक्सिको ड्रग कार्टलचे मेंबर्स स्वतःला 'नॉर्को किंग' सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहेत. इन्स्टाग्रामवर दोघांमध्ये लक्झरीयस लाइफस्टाइल आणि अय्याशी दाखवण्याचा आटापिटा सुरू आहे.

कोण आहे अल चापो?
अमेरिकेच्या या व्यक्तीला ड्रग्जच्या जगतातील गॉडफादर म्हणालात. ओसामा बिन लादेननंतर अल चापो हाच अमेरिकेचा दुसरा मोस्ट वाँटेड आहे. अल चापो मेक्सिको सिनालोआ कार्टलचा बॉस आहे. काही महिन्यांपूर्वीच तो मेक्सिकोच्या हाय सेक्युरिटी जेलमधून दुसऱ्यांदा पळण्यात यशस्वी झाला होता. पोलिस अजूनही त्याच्या शोधात आहेत.

पुढील स्लाइड्सवर पाहा. ड्रग माफियांनी पोस्ट केलेले काही PHOTOS