आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताशी युद्ध हा अंतिम पर्याय नाही : अब्बासी; ‘काश्मीर प्रश्नांवर चर्चेतून तोडगा शक्य’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन- भारताशी युद्ध हा पर्याय नाही. फक्त चर्चेद्वारेच काश्मीरसह सर्व प्रलंबित मुद्द्यांवर तोडगा निघू शकतो, असे प्रतिपादन पाकिस्तानचे पंतप्रधान शाहिद खाकान अब्बासी यांनी केले आहे. 
 
लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सच्या दक्षिण आशिया केंद्रात ‘पाकिस्तानचे भवितव्य : २०१७’ या विषयावरील परिषदेत बोलताना अब्बासी म्हणाले की, काश्मीर हा दोन्ही देशांतील ‘प्रमुख मुद्दा’ आहे. तो सुटल्याशिवाय भारतासोबतचे पाकिस्तानचे संबंध तणावपूर्णच राहतील. कुठल्याही पातळीवर चर्चा करण्याची आमची तयारी आहे. युद्ध हा पर्याय नाही. सध्या जरी चर्चा बंद असली तरी भविष्यात ती होऊ शकते. पाकिस्तानात २०१८ मध्ये तर भारतात २०१९ मध्ये निवडणूक होत आहे. त्यामुळे चर्चा होण्याची शक्यता आहे.  

अब्बासी यांनी या वेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. एका प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले की, स्वतंत्र काश्मीरच्या संकल्पनेला पाठिंबा मिळणार नाही. ही संकल्पना नेहमीच मांडली जाते, पण तिला प्रत्यक्षात काहीही आधार नाही. सुरक्षा परिषदेच्या ठरावात काश्मीरमधील लोकांनाच स्वयंनिर्णयाचा अधिकार देण्यात आला आहे. त्यामुळे या प्रश्नावर तोच तोडगा आहे.  अब्बासी यांनी परिषदेत दिलेल्या भाषणाचा मध्यवर्ती बिंदू असा होता की, पाकिस्तान जगासाठी दहशतवादाच्या विरोधात लढाई लढत आहे, जगानेही हा मुद्दा लक्षात घ्यायला हवा. दहशतवादाच्या विरोधात लढण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.  

अब्बासी यांनी या वेळी पाकिस्तानचे परराष्ट्र धोरण आणि जागतिक सत्तांशी असलेल्या संबंधांची माहिती दिली. पाकिस्तान जागतिक दहशतवादाच्या विरोधात लढा देत आहे हा मुद्दा अमेरिकेत समजून घेतला जात आहे. पाकिस्तान आणि अमेरिका यांच्यातील संबंध नेहमीच अफगाणिस्तानच्या चष्म्यातून पाहिले जाऊ नयेत, अशी टिप्पणीही त्यांनी केली.  
बातम्या आणखी आहेत...