आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: तुर्कीने पाडले रशियाचे सुखोई, 5 मिनिटांत दिल्या होत्या 10 वॉर्निंग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रक्का- तुर्कीच्या लष्कराने मंगळवारी सीरियात रशियाचे एक लढाऊ विमान पाडले. रशियाने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. न्यूज एजन्सी एएफपीच्या वृत्तानुसार, तुर्कीच्या लष्कराने रशियन 'सुखोई-24' ला आपला निशाणा बनवले. 'Su-24 विमान' फायरिंग करत सीरियातील यमादी गावाजवळ कोसळले.

तुर्कीच्या लष्कराने दावा केला आहे की, रशियाचे लढाऊ विमान हैते सूबेजवळील एअरस्पेसमध्ये शिरले होते. विमानाला लक्ष्य करण्याआधी पाच मिनिटांत 10 वेळा इशारा देण्यात आला होता. त्यानंतर कारवाइर्रू केल्याचे तुर्कीच्या लष्कराने म्हटले आहे. मात्र, रशियाने तुर्कीचा आरोप फेटाळला आहे.

दरम्यान, यापूर्वी 11 ऑक्टोबरला तुर्कीच्या लष्कराने एक रशियन फायटर जेट विमान पाडले होते.
व्हिडिओ आला समोर...
तुर्की लष्कराने रशियन विमान पाडल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. स्थानिक वृत्तवाहिनी Habertürk TV नुसार, घटनास्थळी एक रिपोर्टर उपस्थित होता. त्याने घटनाक्रम आपल्या कॅमेरात कैद केला आहे.

थोडक्यात बचावले दोन्ही वैमानिक
रशियाचे लढाऊ विमान सुखोई-24 मधील दोन्ही वैमानिक थोडक्यात बचावले आहेत. सुखोई-24 कोसळत असताना दोन्ही वैमानिकांनी विमानातून उड्या घेतल्या. दोन पैकी एका वैमानिकाला सी‍रियातील दहशतवाद्यांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती मिळाली आहे. दुसरीकडे, रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
तुर्कीने दिला होता इशारा...
तुर्कीच्या लष्कराने रशियन विमानाला टार्गेट करण्‍यापूर्वी सतर्कतेचा इशारा दिला होता. पाच मिनिटांत तब्बल 10 वेळा वॉर्निंग देण्यात आल्या. परंतु सुखोई 24च्या वैमानिकांनी त्याकडे दुर्लक्ष केले. हैते सूबेजवळी एअरस्पेसमध्ये रशियन विमान शिरताच तुर्कीच्या लष्कराने ते सीरियात पाडले.

रशिया आणि तुर्की या दोन्ही राष्ट्रात सीरियावरून वाद सुरु आहे. यापूर्वी ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात सीरिया व तुर्कीवरील हवाई हल्ले रोखण्यासाठी नाटोने रशियाला इशारा दिला होता.

पुढील स्लाइडवर पाहा, रशियन सुखोई 24 कोसळतानाचा फोटो...