आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वॉरेन बफेंना गुंतवणुकीसाठी मिळेना साधन; महिन्याकाठी १० हजार कोटी रुपयांची आवक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ओमाहा - जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती वॉरेन बफे यांना सध्या अतिरिक्त पैशांची चिंता सतावते आहे. त्यांच्याकडे महिन्याकाठी येणाऱ्या पैशाच्या आवकच इतकी आहे की ही रक्कम गुंतवण्यासाठी साधने कमी पडत आहेत. बुधवारी एका अहवालामुळे ही बाब समोर आली. अहवालानुसार बफे यांच्या बर्कशायर हॅथवे कंपनीकडे सध्या ७३०० कोटी डॉलर अर्थात ४.८५ लाख कोटी रुपये रोकड आहे. हा आतापर्यंतचा उच्चांक आहे. एवढेच नव्हे तर, दिवसेंदिवस ही रोकड गतीने वाढते आहे. बर्कशायर कंपनी ९० प्रकारचे व्यवसाय करते. यातून त्यांना महिन्याकाठी रोख १५०० कोटी डॉलर अर्थात ९,९८० कोटी रुपये मिळतात. एखादी कंपनी खरेदी करून किंवा एखाद्या कंपनीचे बहुतांश समभाग विकत घेतल्याने हा नफा त्यांच्या पारड्यात पडत आहे. यंदाच्या जानेवारीपासून बफे यांच्याकडील रोख रक्कम सातत्याने वाढते आहे. जानेवारीत त्यांनी विमान क्षेत्राशी निगडित प्रेक्सिशन कास्टपार्ट कंपनी २.१५ लाख कोटी रुपयांत अधिग्रहित केली. बर्कशायरच्या इतिहासातील हे सर्वात मोठे अधिग्रहण होते. तेव्हापासून त्यांच्याकडील रोख रकमेत वाढ होत आहे.
ऑफ परमानंट व्हॅल्यू : स्टोरी ऑफ वॉरेन बफे या पुस्तकाचे लेखक गुंतवणूकदार एंडी किलपॅट्रिक यांच्या मते, मला वाटते योग्य किमतीच्या एखाद्या बड्या सौद्याच्या ते शोधात आहेत. विशेष म्हणजे, बर्कशायरकडील सर्वच्या सर्व रोकड उपलब्ध नसते, कंपनीला स्वत:कडे किमान १.३३ लाख कोटी रुपये ठेवावेच लागतात. विमा दावा किंवा गरजेसाठी ही रक्कम राखावी लागते.
ओमाहा विद्यापीठाचील प्रो. जॉर्ज मॉर्गेन यांच्या मते, खरेदीच्या बाबत वॉरेन जास्त चर्चा करत नाहीत. तसेच ज्या सौद्याची चर्चा रद्द करतात, त्याच्याविषयीही फारसे भाष्य ते करत नाहीत. त्याचवेळी गुंतवणूकदार त्यांच्या आगामी खरेदी विषयी तर्क वितर्कात मग्न असतात. मॉर्गेनच्या मते, ते मार्स कँडी खरेदी करतील. काही गुंतवणूकदारांच्या मते, ते आपल्या युटिलिटी प्रकल्पाचा विस्तार करतीस. मात्र सध्या व्याजदराबाबत जी स्थिती आहे, त्यात बर्कशायरला आपल्याकडील एकत्रित रोख रकमेपेक्षा जास्त व्याज कमाई मिळत नसल्याचे चित्र आहे.

गुगलपेक्षा जास्त तर मायक्रोसॉफ्ट पेक्षा कमी
अमेरिकेतील अॅपलकडे सर्वाधिक १४.३७ लाख कोटी तर मायक्रोसॉफ्टकडे ५.९९ लाख कोटी. गुगलकडे ४.२९ लाख कोटी राखीव रोकड.

भारताच्या संरक्षण बजेटपेक्षा दुप्पट
भारताचे २०१६ चे संरक्षण बजेट २.४० लाख कोटी. बफेट यांच्याकडे याच्या दुप्पट रोकड. २०१७ साठी भारताचे ३.४० लाख कोटी बजेट.

नेपाळच्या जीडीपीच्या चौपट रोकड बफेंकडे
२१२ पैकी १४१ देशांचा जीडीपी बफेंच्या रोख रकमेपेक्षा कमी. श्रीलंकेच्या ४.९२ लाख कोटी रुपये आणि नेपाळच्या १.२७ लाख कोटी रु.जीडीपीपेक्षा चार पट ही रक्कम जास्त आहे.
बातम्या आणखी आहेत...