आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वॉरेन बफे म्हणाले- माकडातही ट्रम्पला हरवण्याची क्षमता, पराजयासाठी प्रयत्न करणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आेमाहा - रिपब्लिकन पार्टीचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांना समर्थन देण्यास अमेरिकन उद्याेजकांनी स्पष्ट नकार दिला. न्यूयॉर्कचे माजी महापौर आणि अब्जाधीश मायकल ब्लूमबर्ग, मायकल कुबन यांनी ट्रम्प यांना उघड विरोध केला. ट्रम्प यांचे जवळचे मित्र व अब्जाधीश चार्ल्स कोच यांनी म्हटले की, ट्रम्पसाठी आपल्याकडे पैसे नाहीत. भारतवंशीय उद्योजक शलभ कुमार यांनी ट्रम्प यांच्या निवडणूक प्रचारासाठी ६ कोटी रुपये दिले आहेत. ते आतापर्यंतचे सर्वात मोठे देणगीदार ठरले. दानशूर म्हणून ख्याती असणारे उद्योजक वॉरेन बफे यांनी सांगितले की, ट्रम्प यांच्या पराजयासाठी सर्व प्रयत्न करणार. बफे यांनी नेब्रास्कामध्ये हिलरींच्या निवडणूक अभियानात म्हटले की, ट्रम्प हेतूपुरस्सर स्वत:च्या आयकर परताव्याची माहिती जारी करत नाहीत. बफेट म्हणाले, ट्रम्पने १९९५ मध्ये अटलांटिक सिटी हॉटेल्स, कॅसिनो रिसॉर्टला न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेंजमध्ये सूचिबद्ध केले होते. अनेक वर्षे त्यांची कंपनी तोट्यात होती. हा काळ असा होता की माकडही ट्रम्प यांच्या कंपनीला मात देऊ शकले असते.

ट्रम्प यांनी फोटो ट्विट केला... युजर संतप्त
>ट्रम्प तुम्ही खासगी जेटमध्ये चांदीच्या चमच्याने चिकन खात आहात. तुम्ही सामान्य माणूस होऊ शकत नाही.
>ट्रम्प यांची स्पर्धा माध्यमांशी असल्यासारखे वाटत आहे. हिलरी क्लिंटनशी नव्हे.
>गेल्या २४ तासांत ट्रम्प यांनी १५ ट्विट केले. पैकी ८ सीएनएनविरोधी.
पुढे वाचा...
> हिलरी दानव, तर सीएनएन म्हणजे क्लिंटन न्यूज नेटवर्क : ट्रम्प
> या मीडिया आऊटलेट वर घातली बंदी
> ट्रम्पविरोधी उद्योजक आणि त्यांची एकूण मालमत्ता
बातम्या आणखी आहेत...