आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

SHOCKING VIDEO: पाहा, भारतीय तरुणीला समुद्री लाटांनी कसे नेले ओढत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
समुद्राच्या लाटांवर स्वार होण्याची, त्या लाटा अंगावर घेण्याची प्रत्येकाची इच्छा असते. मात्र अनेकदा या लाटा जीवघेण्या ठरु शकतात. असाच एक शॉकिंग व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आयर्लंडच्या एका आयलँडवर एक भारतीय तरुणी विशाल समुद्री लाटांसोबत वाहून गेली. तिथेच समुद्र किनाऱ्यावर असेलेल्या एका पर्यटकाने हा व्हिडिओ शुट केला आहे. या तरुणीचे नाव अप्पू गुप्ता असून ती कोलकत्याची रहिवासी होती. मात्र, तिला वेळीच वाचवण्यात आले आणि आता ती सुरक्षीत आहे.
प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्यानुसार, अप्पू आरन आयलँडवरील उंच टेकडीवर उभी राहून समुद्राच्या उंचच उंच लाटांचा आनंद घेत होती. या लाटांना कॅमेरात कैद करत होती. तेव्हाच एक उंच लाट उसळली आणि ती अप्पूला सोबत घेऊन गेली. एवढेच नाही तर ही लाट नंतर दुसऱ्या टेकडीवर जाऊन आदळली. मात्र, एवढ्या मोठ्या दुर्घटनेतूनही अप्पू वाचली. आता ती सुरक्षीत आहे. किनाऱ्यावर असलेल्या मदत पथकाने तिला वेळेवर वाचवले आणि तिच्यावर वेळेवर उपचार करण्यात आले.
अप्पूला वाचवणारे सीमन मॅककार्थीने सांगितले, की मी माझ्या गर्लफ्रेंडसोबत तिथे उपस्थित होतो. ती मुलगी उंच टेकडावर जाऊन व्हिडिओ शुट करत होती. तेव्हाच एक उंच लाट आली आणि त्यात ती वाहून गेली. मात्र पुढच्याच क्षणाला ती बाहेर येताना दिसली आणि आम्ही 999 वर कॉल करुन मदत पथकाला बोलावले. त्याचवेळी सीमनची गर्लफ्रेंड शेजारच्या घरात गेली आणि कोस्टगार्डला बालोवले.
सीमनने सांगितले, की अप्पूच्या आईची स्थिती अतिशय वाईट होती. तिला सांभाळणे अवघड झाले होते. मात्र मदत पथकाने शर्थीचे प्रयत्न केले आणि लाट शांत झाल्यानंतर समुद्रात खोल गेलेल्या अप्पूला शोधून काढले. आता ती हॉस्पिटलमध्ये आहे. या दुर्घटनेबद्दल अप्पूने सांगितले, की पहिली लाट आली तेव्हा मी लाटेसोबत गेले आणि खोल समुद्रात गेले. मला काही ठिकाणी मार लागला. मला भीती याची होती की आता दुसरी लाट येऊ नये नाही तर त्या लाटेने मला समुद्रात आत ओढण्याची भीती होती. मात्र सीमन आणि त्याच्या गर्लफ्रेंडने मला वाचवले.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, व्हिडिओ