इंटरनॅशनल डेस्क - जपानचे पंतप्रधान शिनझो अॅबे यांचा नुकताच झालेला दोन दिवसीय भारत दौरा पाकिस्तानच्या माध्यमांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. भारत आणि जपानमध्ये झालेल्या बुलेट ट्रेन करार आणि अॅबे तसेच मोदींनी केलेल्या प्रकल्पाच्या भूमीपूजनाच्या चर्चा रंगल्या आहेत. या कार्यक्रमांमध्ये पाकिस्तानचे एक्सपर्ट म्हणत आहेत, की भारतात मोदी बुलेट ट्रेन आणत आहेत. आणि पाकिस्तान केवळ भांडण्यातच मशगूल आहे. काही तज्ञ भारताच्या संस्थात्मक स्थैर्य आणि आर्थिक विकासाचे कौतुक सुद्धा करत आहेत.
उल्लेखनीय बाब म्हणजे, पाकिस्तानसोबत संबंध वाढवताना चीनने त्या देशातही बुलेट ट्रेन आणणार असल्याचे आश्वासन दिले होते. आता मात्र, चीन पाकिस्तानला तुम्ही बुलेट ट्रेनच्या लायकीचे नाहीत असे म्हणत थट्ट उडवत आहे अशी चर्चा सुद्धा सध्या पाकिस्तानी माध्यमांवर रंगली आहे.
पुढील स्लाइडवर पाहा, पाकिस्तानी माध्यमांवर मोदींच्या बुलेट ट्रेन आणि भारतीय अर्थव्यवस्थेचे कौतुक...