आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • We Have Option To Use Nuclear Weapon, Says Pakistan

पाकच्या संरक्षण मंत्र्यांची भारतविरोधी गरळ, म्हणे गरज पडल्यास अण्वस्र वापरू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो : पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा मोहम्मद आसिफ - Divya Marathi
फाइल फोटो : पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा मोहम्मद आसिफ
इस्लामाबाद - पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी आणखी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. गरज पडली तर पाकिस्तान अण्वस्राचा वापर करू शकतो, असे ते म्हणाले आहेत. ख्वाजा आसिफ सोमवारी जियो टीव्हीवरील एका कार्यक्रमात बोलत होते. अण्वस्रांचा वापर हा पर्याय आमच्यासमोर आहे. आम्ही ते सजावटीसाठी ठेवलेले नाहीत. पण आम्हाला ते वापरावे लागू नये अशीच प्रार्थना आम्ही करतो, असेही ते म्हणाले.

देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आसेल तर आम्ही याचा वापर नक्की करणार असे ख्वाजा यावेळी ठासून सांगितले. त्यांनी भारतावर पाकिस्तानविरोधात छुपे युद्ध पुकारल्याचा आरोपही केला. भारत प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे दहशतवादाला खतपाणी घालत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे. पाकिस्तान स्वसंरक्षण करण्यास समर्थ असल्याचेही ते म्हणाले.

दरम्यान, मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील मास्टरमाइंड हाफीज सईदच्या जमात-उद-दावा संघटनेवर बंदी लावण्यासही त्यांनी नकार दिला आहे. संघटनेच्या विरोधात दहशतवादी कारवाया आणि लश्कर-ए-तोयबाशी संलग्न असल्याचे पुरावे मिळाले नाही असे त्यांनी सांगितले. यूएन सेक्युरिटी काऊन्सिलने जमात-उद-दावाची स्थापना लश्कर-ए-तोयबाला नवे नाव देण्यासाठी झाली होती, असा प्रस्ताव सादर केला होता. पाकिस्तानच्या संसदेत पाकचे किनारी भागांचे राज्यमंत्री रिटायर्ड जनरल अब्दुल कादीर बलोच यांनी ही माहिती दिली. पण यासंबंधी पाकिस्तानला पुरावे मिळाले नसल्याचेही त्यांनी सांगितले.

जमात-उद-दावा ही सेवाभावी संस्था
बलोच यांनी सांगितले की, जमात-उद-दावा ही सेवाभावी संस्थेसारखे काम करत होती. रुग्णालये, दवाखाने, शाळा, रुग्णवाहिका चालवतात. त्यांनी 2008 ते 2010 दरम्यान ऑफिसेस बंद केली होती. पण लाहोर हायकोर्टाने पुन्हा सुरू करण्याचे आदेश दिले.