आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फ्रान्स हल्ला: भारतीय वंशाच्या महिलेने सांगितले- ट्रक घुसला, आम्ही ह़ॉटेलकडे पळालो

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पॅरिस अटॅकनंतर लावण्यात आलेली आणीबाणी आणखी तीन महिने वाढविण्यात आली आहे. - Divya Marathi
पॅरिस अटॅकनंतर लावण्यात आलेली आणीबाणी आणखी तीन महिने वाढविण्यात आली आहे.
पॅरिस - फ्रान्सच्या नीस शहरात बास्टिल डे साजरा होत असताना झालेल्या हल्ल्यात आतापर्यंत 80 जण मृत्यूमुखी पडले आहेत. घटनास्थळी उपस्थित लोकांनी सांगितले की हल्ला अतिशय भयावह होता. पांढऱ्या रंगाचा ट्रक अतिशय वेगात येत होता. जवळपास 1-2 किलोमीटर पर्यंत ट्रक मार्गात जे-जे येतील त्यांना चिरडत चालला होता. येथे भारतीय वंशाच्या एक महिला उपस्थित होत्या. त्यांनी सांगितले, की काय होत आहे हे सुरुवातीला काहीच कळाले नाही. एक ट्रक जमावात घुसला आणि आम्हाला वाटले काही अघटीत होणार म्हणून आम्ही हॉटेलच्या दिशेने पळालो.

हरजीत यांच्यासह दुसऱ्या प्रत्यक्षदर्शींनी काय सांगितले...
- 42 वर्षांच्या हरजीत सारंग या लंडनमध्ये सरोगसी आणि एलजीबीटी लॉयर आहेत. दोन मुले आणि पतीसोबत त्या नीसमध्ये होत्या.
- हल्ल्यानंतर त्यांनी ट्विट केले की मी धक्क्यात आहे. मला याचा फार राग येत आहे की माझी मुले या घटनेचे साक्षीदार आहेत. मी त्यांना तिथे का नेले ? असे का होत आहे ?
- आणखी एका ट्विटमध्ये म्हटले आहे, 'लोकांना अशापद्धतीने मारणे अतिशय वेदनादायी होते. यानंतर मी माझ्या मुलांना कोणत्याही पब्लिक इव्हेंटमध्ये घेऊन जाणार नाही. आता मी हॉटेलमध्ये आहे.'

सगळेकाही क्षणात घडले आणि पळापळ झाली
- आणखी एका प्रत्यक्षदर्शीने सांगितल्यानुसार, एक ट्रक अचानक लोकांना चिरडत पुढे येत होता. आम्हाला काही कळायच्याआधीच कित्येक लोक जमीनीवर पडलेले होते आणि पळापळ सुरु झाली होती.

लोक हवेत उडाले
- घटनास्थळी उपस्थित पत्रकार डेमियन एलमंडने सांगितले, की ट्रक लोकांना उडवत चालाला होता. असे वाटत होते की लोक बॉडी पिनसारखे हवेत उडत आहेत.

पळा... पळा अटॅक झाला
- एक प्रत्यक्षदर्शी म्हणाला, सर्वच पळत सुटले होते. हल्ला झालाय पळा.. पळा असे ओरडत सर्वच धावत सुटले होते.

गोळीबाराचा आवाज ऐकला
एकाने सांगितल, की मी गोळीबार झाल्याचा आवाज ऐकला होता. लोक नुसते ओरडत होते, कोणाला काहीच कळत नव्हते.

क्षणात रस्त्यावर पडला मृतदेहांचा खच
- फ्रान्सच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, की येथे फार उत्साहाचे वातावरण होते. लोक आपल्या कुटुंबासह आलेले होते. मात्र क्षणात रस्त्यावर मृतदेह पडलेले पाहायला मिळाले.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, घटनेनंतरचा सून्न रस्ता
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...