आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रिटनमध्ये तापमान -9 डिग्रीवर: पूराचा धोका, 67 अलर्ट जारी, आर्मीही तैनात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्रिटनमधील काही भागात पारा -9 डिग्री सेल्सियसपर्यंत खाली घसरला आहे. - Divya Marathi
ब्रिटनमधील काही भागात पारा -9 डिग्री सेल्सियसपर्यंत खाली घसरला आहे.
लंडन- ब्रिटनमधील पारा खाली घसरत -9 डिग्री सेल्सियसवर पोहचला आहे. बर्फबारी आणि पूर यावरून अलर्ट जारी केला आहे. दुसरीकडे, ईस्ट कोस्टमध्ये पूराचा धोका पाहता तेथील मोठ्या प्रमाणात घरे व बिल्डिंग्स खाली करण्यात आल्या आहेत. 80 पेक्षा जास्त फ्लाईट्स रद्द करण्यात आल्या आहेत. पूर येण्याबाबत 67 इशारे आणि 76 अलर्ट...
 
- वेदर डिपार्टमेंटने इंग्लंड, स्कॉटलँड, वेल्स आणि नॉर्दर्न आर्यलंडमध्ये वेगाने बर्फाळ वारे वाहत आहेत. तसेच बर्फ पडण्याची वॉर्निंग दिली आहे.
- स्कॉटलंड, वेल्स, ब्रॅडफोर्ड आणि कुम्ब्रियात कडाक्याची थंडी पडली आहे. या ठिकाणी पारा मायनस 9 डिग्री इतका खाली घसरला आहे.
- वेदर डिपार्टमेंटने जोरदार बर्फवृष्टी होण्याचा अंदाज वर्तवत 'यलो वार्निंग' दिली आहे. अनेक भागात 7 इंचपर्यंत बर्फवृष्टी होण्याचा अंदाज आहे.
- संपूर्ण यूकेमध्ये पूर येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याबाबत आतापर्यंत 67 वॉर्निंग, 76 अलर्ट आणि 7 गंभीर धोके सांगितले गेले आहेत.
- डिफेन्स मिनिस्ट्रीने कॅटेरिक आर्मी बेसमधील 100 जवानांना लिंकनशायर कोस्टवर तैनात केले आहे.
- येथे राहत असलेल्या 3000 लोकांना स्थलांतरित करत घरे खाली केली आहेत. यासाठी लष्कराचे जवान मदत करत आहे.
- पोलिसाचे म्हणणे आहे की, कोस्टच्या आसपास पूराचा धोका असलेली ठिकाणे शोधून काढली आहेत. 
- लिंकनशायर शिवाय सफफ्लॉक, नॉरफ्लॉक आणि एसेक्स एरियात सुमारे 1,100 बिल्डिंग्स खाली केल्या आहेत.
 
स्कूल-ऑफिस बंद, विमानाची उड्डाणे रद्द-
 
- बर्फवृष्टी आणि खराब वातावरणामुळे स्कूल आणि ऑफिस बंद केली गेली आहेत. 
- लंडनमधील हिथ्रो एयरपोर्टवरील अधिका-यांनी सांगितले की, 80 उड्डाणे रद्द केली गेली आहेत. प्लेन्सच्या ऑपरेशन्समध्ये खूपच अडचणी येत आहेत.
- त्यांनी सांगितले की, प्लेनच्या रूटमध्ये कोणताही बदल केला जाऊ शकत नाही त्यामुळे फ्लाईट्स रद्द करण्यात आली आहेत. 
- हिथ्रोसह गॅटविक एयरपोर्टवरील सुद्धा चार उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.
 
पुढे स्लाईडद्वारे पाहा, काय स्थिती आहे ब्रिटनमधील बर्फवृष्टीची....