आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आपण सतत स्वत:वर 225 किलो चिंतेचे ओझे बाळगतो, लोक वर्षातून 38 दिवस चिंतेत घालवतात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बोर्नमाऊथ (ब्रिटन) - आपण रोज डोक्यावर चितांचे किती ओझे वागवतो याचे मोजमाप करण्याची पद्धत आता अस्तित्वात आली आहे. एका प्रश्नमंजुषेत भाग घेऊन तुम्ही आपल्यावर चिंतांचे किती ओझे आहे ते जाणू शकाल. आपली चिंता नेमकी किती किलोची आहे, तेवढे वजन कोणत्या प्राण्याचे आहे, हे पण तुम्ही जाणू शकाल. म्हणजे रोज तुम्ही नेमक्या कोणत्या प्राण्याइतके वजन डोक्यावर वागवता तेही कळेल. 
 
ब्रिटनमधील एका विमा कंपनीने यासाठी एक गणितीय सूत्र तयार केले आहे. त्याला ‘वेट ऑफ वरी कॅलक्युलेटर’ असे नाव देण्यात आले आहे. या सूत्राच्या चाचणीसाठी कंपनीने एक सर्वेक्षणही केले. यातून असे स्पष्ट झाले की, सरासरी एक माणूस रोज आपल्यावर २२५ किलो चिंतेचे ओझे वागवतो. म्हणजे हे वजन एखाद्या मोठ्या सिंहासारखे आहे. 
 
हे कॅलक्युलेटर एका गेमसारखे आहे. भारतातही तो अॅक्टिव्ह झाला आहे. तुम्हाला फक्त त्या प्रश्नमंजुषेतून जावे लागेल. याच्या एकूण सात स्लाइड असून प्रत्येक स्लाइडवर तीन प्रश्न आहेत. एक स्लाइड जीवनातील एका क्षेत्राबाबत प्रश्न विचारते. उदा. आर्थिक, आरोग्यविषयक, सामाजिक, वैयक्तिक, नातेसंबंध, कामकाज आणि इतर. यावर काही लिहिण्याची गरज नाही. हे मल्टिपल च्वॉइस प्रश्नासारखे असतील. तुम्हाला केवळ एक पर्याय निवडावयाचा आहे किंवा १० पाॅइंट स्केलवर क्रम द्यावयाचा आहे.
 
सर्व प्रश्नांची उत्तरे दिल्यावर गुण मिळतील. प्रत्येक क्षेत्रातील चिंतेसाठी वेगवेगळे गुण असतील. यामुळे रोज आपण कोणत्या गोष्टीची अधिक चिंता करतो, ते कळेल. हे गुण वेट ऑफ वरी कॅलक्युलेटर एका सूत्रात टाकून निकाल देईल. ताे किलोग्रॅममध्ये असेल. उदा. समजा आपला निकाल ९० किलो आला तर याचा अर्थ असा की आपण रोज ९० किलो अतिरिक्त ओझे वागवत आहात. याचा परिणाम थेट तुमच्या आरोग्यावर होतो.
 
कंपनीने सांगितले, की सर्वाधिक लोक पैशाचीच चिंता करतात. या चिंतेचे वजन सरासरी ६९.५ किलो आहे. त्यानंतर लोकांना वैयक्तिक नातेसंबंध, करियर, शरीर आणि आपण कसे दिसतो, याची चिंता वाटते. याशिवाय इतर लोक आपल्याविषयी काय बोलतात आणि कसा विचार करतात याची बहुतांश लोकांना चिंता वाटते.

प्रत्येक माणूस रोज सरासरी २ तास २८ मिनिटे चिंता करण्यात घालवतो, वर्षात सुमारे ९०० तास
वरी ऑफ वेट कॅलक्युलेटर तयार करणाऱ्या कंपनीने वेगवेगळ्या देशांत सर्वेक्षण केले. सुमारे १ लाख लोकांनी प्रश्नमंजुषेत भाग घेतला. या प्रश्नांच्या उत्तरांच्या आधारे असे दिसून आले की, प्रत्येक माणूस सरासरी २ तास २८ मिनिटे वेगवेगळ्या विषयांवर चिंता करण्यात घालवतो. म्हणजे वर्षात होतात सुमारे ९०० तास.
बातम्या आणखी आहेत...