आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विचित्र गेम शो : प्रतिस्पर्ध्याच्या तोंडात झुरळ टाकणारा विजेता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जपान- ऐकायला आणि त्यापेक्षा पाहायलाही विचित्र वाटणारी ही बाब आहे. जपानमध्ये अशा प्रकारचा गेम शो आयोजित केला जातो, ज्यात सहभागी व्यक्तींना प्लास्टिकची पारदर्शक नळी दिली जाते. त्यात एक झुरळ ठेवले जाते. यात प्रतिस्पर्ध्याच्या तोंडात झुरळ घालू शकणारा विजेता घोषित केला जातो. जास्तीत जास्त श्वास घेऊन जोरोने फुंकल्यास स्पर्धेत हमखास मिळते, असे सांगण्यात येते. शोमध्ये सहभागी प्रेक्षकांना हा प्रकार आेंगळवाणा वाटताे. मात्र, तरीही फेसबुकवर या शोची क्लिप १.६९ कोटींपेक्षा जास्त वेळेस पाहिली गेली आहे. या शोमध्ये कोणीही रेफ्री नसतो. वाद उद्््भवल्यास काय करावे, याचीही व्यवस्था नाही. याबरोबर पुरस्काराच्या रकमेचीही माहिती नाही. या शोमध्ये तरुण मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत.
बातम्या आणखी आहेत...