ब्रिटनच्या शाही परिवारात राजकुमारीचे आगमन होताच संपूर्ण ब्रिटनमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या नव्या पाहुणीच्या आगमनाचा आनंदही इंग्लंडमध्ये अत्यंत वेगळ्या प्रकारे साजरा केला जात आहे. शनिवारी रात्री लंडनचे प्रत्येक ऐतिहासिक स्थळ या आनंदात गुलाबी लंगात न्हाऊन निघाले होते.
लंडन ब्रिजही या निमित्ताने 'गुलाबी' रंगांच्या बल्बच्या प्रकाशात झळाळून गेले होते. त्याशिवाय बेलफास्ट सिटी हॉल, द गोल्डन ज्युबली ब्रिज, लंडन आय, ट्रॅफलगर स्क्वेअर, हिल्टन हॉटेल आणि मर्चंट स्क्वेअर फाऊंटनही गुलाबी रंगात रंगून गेले होते. गुलाबी रंगात अत्यंत सुंदन नजारा ब्रिटनच्या नागरिकांनी अनुभवला.
त्याशिवाय लंडनच्या बीटी टॉवरनेही 'इट्स अ गर्ल' मॅसेज फ्लॅश करत रॉयल बेबीच्या आगमनाचे अनोखे स्वागत केले. ब्रिटीश एअरवेजने त्यांच्या अरायव्हल डिस्प्ले बोर्डवर आठ वाजून 34 मिनिटांनी 'इट्स अ गर्ल' लिहूत डेस्टिनेशन लंडन दाखवले. तर ब्रिटिश रॉयल नेव्हीनेही त्यांच्या युद्धनौकेवर 'सिस्टर' आकारात मानवी साखळी तयार करत राजकुमारीचे स्वागत केले.
प्रिन्स विल्यमची पत्नी केट मिडलटनने शनिवारी सकाळी 8 वाजून 34 मिनिटांनी लंडनच्या सेंट मेरी रुग्णालयात मुलीला जन्म दिला. राजमहालाच्या वतीने याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली. त्यानंतर रुग्णालयाबाहेर असलेल्या शेकडो चाहत्यांनी जल्लोष केला.
प्रिन्स विल्यम आणि केट यांचा एप्रिल 2011 मध्ये विवाह झाला होता. जुलै 2013 मध्ये डचेस ऑफ केंब्रिज (केट मिडलटन ) आणि प्रिन्स विल्यम यांचे पहिले अपत्य (प्रिन्स जॉर्ज) याच रुग्णालयात जन्मले होते.
पुढील स्लाइड्सवर पाहा, गुलाबी रंगात रंगलेले London