आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Well This Is Awkward: Jack Ma Book Being Pirated On Alibaba Store

चीनमध्ये लोक अलिबाबाच्या संस्थापकाला समजायचे भामटा; जॅक मावर पुस्तक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क- चीनमधील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि सर्वात मोठी ई-काॅमर्स कंपनी अलिबाबाचे संस्थापक जॅक माची कहाणी पुस्तकरूपाने समाेर आली आहे. पुस्तकाचे नाव आहे ‘अलिबाबा : द हाऊस दॅट जॅक मा बिल्ट’.

जॅकचा सल्लागार राहिलेल्या डंकन क्लार्क यांनी ते लिहिले आहे. पुस्तकात म्हटले आहे की, जॅक यांनी हांगझू येथील आपल्या अपार्टमेंटमध्येच १९९९ मध्ये अलिबाबा कंपनीचे कामकाज सुरू केले. तेव्हा लोक त्यांंच्याकडे संशयाच्या नजरेने पाहत असत. तीन वर्षांपर्यंत तर लोक भामटाच समजत होते. खरे तर हा आपले जगणे सुकर करणारा माणूस असल्याचे नंतर लाेकांच्या लक्षात आले.

पुस्तकात सुरुवातीलाच जॅक मा यांचे नाव कसे पडले हे विशद केले आहे. वास्तविक आधी त्यांचे नाव मा युन होते. १९७०च्या दशकात अमेरिकी राष्ट्रपती निक्सन चीनमध्ये आले होते. तेव्हा हांगझू भागातही ते गेले. याच भागात ८ वर्षांचा मा युन राहत होता. परदेशी लोकांना पाहून मा युनला इंग्रजी शिकण्याची इच्छा व्हायची. रेडिओवर तो इंग्रजीतील कार्यक्रम ऐकायचा. ८ वर्षांनंतर गावात अमेरिकेचे काही पर्यटक आले. १५ वर्षांच्या मा युनची मैत्री तेव्हा एका महिला टुरिस्टशी झाली. त्या महिलेचे पती आणि पिता दोघांचेही नाव जॅक होते. तिने मा युनला जॅक नाव ठेवण्याचा सल्ला दिला. यामुळे पाश्चात्त्य देशांशी जवळीक साधणे त्याला सोपे जाईल असेही तिने सांगितले. अशा रीतीने मा युनचा जॅक मा झाला. चीनमधीलउर्वरित. पान १२
सर्वात मोठा उद्योजक होण्यात जॅकला स्वारस्य नव्हते. जगातील नंबर वन होण्याचे त्याचे स्वप्न होते. जॅकचे वडील फोटोग्राफर आणि आई कारखान्यात काम करत होती. काॅलेजातील प्रवेश परीक्षेतही जॅक नापास झाले होते. नोकरीसाठी जिथे कुठे अर्ज केला, तेथून नकारच मिळाला. इंग्रजी शिकल्यानंतर जॅक भाषांतराची कामे करू लागले. १९९०च्या दशकात ते पहिल्यांदा अमेरिकेतील सिएटलला गेले. तेथे त्यांच्या एका मित्राने त्यांना इंटरनेटबाबत सांगितले. त्याच वेळी जॅक यांच्या डोक्यात एक कल्पना आकाराला अाली. चीनच्या कंपन्यांच्या आॅनलाइन उपस्थितीने खूप काही फायदा होऊ शकतो. त्यानंतर त्यांनी अलीबाबाची पायाभरणी केली. क्लार्क पुढे लिहितात, जॅक कधीही कोणाला काही समजावून सांगत तेव्हा मार्शल आर्टछया कादंबऱ्यांचे दाखले देऊनच समजावत. चीनमध्ये इंटरनेटवर सरकारी नियंत्रण असताना त्यांनी एवढी मोठी कंपनी उभी केली ही बाबही विलक्षण आहे. सुरुवातीला अलीबाबाच्या कर्मचाऱ्यांना मोठ्या मुश्किलीने दरमहा ५० डाॅलर मिळायचे. सातही दिवस ते काम करायचे. दररोज १६ तास. कर्मचारी १० मिनिटांपेक्षा अधिक अंतरावर असू नयेत असे जॅक यांचे मत होते.

पुढील स्लाइडवर वाचा, खोटे बोलून कल्पना विकली...