आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प. नेपाळला भूकंपाचे धक्के : पहाटे २.२९च्या सुमारास बसला धक्का

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रतिकात्‍म‍ि छायाचित्र - Divya Marathi
प्रतिकात्‍म‍ि छायाचित्र
काठमांडू- भारताच्या सरहद्दीजवळील डारचुला जिल्हा बुधवारी भूकंपाने हादरला. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता ४.१ एवढी नोंदवण्यात आली आहे. पहाटे २.२९च्या सुमारास हा धक्का बसला. काठमांडूपासून ७५० किलोमीटर अंतरावर भूकंपाचे केंद्र आहे. २५ एप्रिलच्या प्रलयंकारी भूकंपानंतर देशाला आतापर्यंत ३५२ धक्के जाणवले आहेत. भूकंपाच्या घटनेत ९ हजारांहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला. नेपाळच्या भूकंपाने हजारो लोक बेघर झाले असून मदतीचा आेघ येत आहे.
बातम्या आणखी आहेत...