आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

९/ ११ नंतर व्हाइट हाऊसचे चित्र कसे होते? झाला उलगडा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क - अमेरिकेवर झालेल्या सर्वात मोठ्या ९/ ११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर व्हाइट हाऊसची स्थिती दाखवणारी छायाचित्रे जाहीर झाली आहेत. एका छायाचित्रात टीव्ही वृत्तवाहिनीवर हल्ल्याचे वृत्तांकन पाहताना उपराष्ट्राध्यक्ष डिक चेनी तणावाखाली दिसतात. त्यात अमेरिकी नेते आणि उच्चाधिका-यांच्या चेह-यावर बेचैनी आणि तणाव स्पष्टपणे दिसून येतो. हे छायाचित्र डिक चेनी यांच्या स्टाफ फोटोग्राफरने टिपले होते. अमेरिकेच्या नॅशनल अर्काइव्हजने हे फोटो जाहीर केले.

११ सप्टेंबर २००१ रोजी न्यूयॉर्कचे वर्ल्ड ट्रेड सेंटर, पेंटागॉन आणि पेन्सिल्व्हेनियामध्ये एकाच वेळी हल्ले झाले होते.

०४ प्रवासी विमानांचे दहशतवाद्यांनी केले होते अपहरण. दोन विमाने वर्ल्ड ट्रेड सेंटरला, तिसरे पेंटागॉनच्या इमारतीला धडकवण्यात आले. चौथे पेन्सिल्व्हेनियामध्ये धडकले.

०३ हजार नागरिकांचा हल्ल्यात मृत्यू. हल्ल्यानंतर अमेरिकेतील सर्व विमानतळ बंद करण्यात आले होते. तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांनी राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली होती.