आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...यात अश्लील काय, ही तर पुरुषांची समस्या! 23 वर्षीय मातेचे जगभरातील मातांना खुले पत्र

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जॉन्सन सिटी (अमेरिका) - २३ वर्षीय केली स्टेनली पालकांसोबत एका रेस्तराँमध्ये गेली. तिच्या ९ महिन्यांच्या चिमुकलीस भूक लागली म्हणून तिने अंगावर पाजायला सुरुवात केली. तेवढ्यात केलीच्या पित्याने एक रुमाल दिला आणि झाकून पाज म्हणून सूचना केली. लोक तुझ्याकडे पाहताहेत, असा तक्रारीचा सूरही लावला. कारमध्येच का नाही पाजले म्हणून दटावलेसुद्धा. यावर केली म्हणाली, अडचण काय? मी मुलीस लपवू कशामुळे? या घटनेनंतर तिने जगभरातील मातांना खुले पत्र लिहिले. आईने मुलास दूध पाजताना लाजण्याचे कारण नाही. पुरुषांनी मानसिकता बदलली पाहिजे. पुरुषांनी एखाद्या आईकडे वाईट भावनेने पाहणे योग्य नाही. यावर जगभरातील मातांनीही तिला प्रतिसाद दिला. वाचा तिचे पूर्ण पत्र....

काल रात्री मी पालकांसोबत हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले हाेते. माझी चिमुकली माया पण सोबत होती. ती खूपच रडत होती. मला माहीत होते की तिला काय हवे आहे. मी तिला अंगावर पाजण्यास सुरुवात केली तेव्हा वडिलांनी मला रुमाल दिला. मुलीचा चेहरा झाकून टाक म्हणून सांगितले. मला हे योग्य वाटले नाही. मी थोडी संतापलेच. तरीही मी सावरले. खरेच हॉटेलमधील काही लोक माझ्याकडे टक लावून पाहत होते. जणू मी काही गुन्हाच केला आहे. माझी आई पण सोबत होती. एवढे होऊनही मी मुलीचा चेहरा झाकला नाही. कारण, हा मातेचा अधिकारच आहे. अशा मातांनी घाबरण्याचे काहीच कारण नाही. ब्रेस्टफीडिंग हे अश्लीलतेचे प्रदर्शन म्हणताच येणार नाही. ही खरे तर देवाची देण आहे. मुलगी रडत होती म्हणूनच मी तिला हॉटेलमध्ये ब्रेस्टफीडिंग करण्याचा निर्णय घेतला ना... पोटच्या मुलांना कोणतीही आई बळेच दूध पाजत नाही. खरे तर एखाद्या महिलेने झाकूनच मुलांना दूध पाजावे, अशी अपेक्षाच का कुणी करावी? मुलांना दूध पाजताना आडबाजूलाच बसावे, अशी अपेक्षा का असावी? दुर्दैवाने बहुतांश माता असेच करतात. ब्रेस्टफीडिंग ही मातांची समस्या नाही. ही पुरुषांची समस्या आहे. दूध पाजताना वाईट नजरेने पुरुषांनी पाहावेच का? यावर पुरुषांनीच विचार करायला हवा. पुरुषांनी याबाबत परिपक्वता दाखवलीच पाहिजे.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, २३ वर्षीय केली स्टेनली आणि तिच्या बाळाचे फोटो.....
बातम्या आणखी आहेत...