आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आठवणींवर जगत आहेत जॉर्डनमधील Refugee, वाचा मन हेलावणाऱ्या भावना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिरियामधील लाखो रेफ्युजींनी देश सोडून इतर देशांमध्ये शरण जाणे पसंत केले आहे. परत मायदेशी केव्हा परतता येईल किंवा पुढे आपले काय होईल याची काहीही कल्पनादेखिल या लोकांना नाही. अगदी हाती येईल तेवढे कपडे आणि सामानासह मनभरून आठवणी सोबत घेऊन हे सर्व लोक देश सोडत आहेत. अशा वेळी हे रेफ्युजी त्यांच्याबरोबर काय खास वस्तू घेऊन जात असतील, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला.

घरापासून हजारो किलोमीटर दूर असलेल्या नव्या अनोळखी ठिकाणी हे सर्व रेफ्युजी सध्या जीवन जगत आहेत. रोज नव्याने समोर उभी राहणारी आव्हाने आणि क्रूर वास्तव याच स्थितीत हे सर्व आजही जगत आहे. काही जण रेफ्युजी कॅम्पमध्ये तर काही आपल्या ओळखीच्या अथवा व्यवस्था असेल त्याठिकाणी जीवनातील किमान आजचा दिवस बरा जावा या आशेवर जगत आहेत. यापैकी अनेकांना घर सोडताना अगदी अंगावरच्या कपड्यांवर बाहेर पडावे लागले आहे. पण तरीही एखादी अशी वस्तू असते जी व्यक्ती हमखास सोबत घेऊन जातो. कोणत्याही परिस्थितीत ती वस्तू मागे राहता कामा नाही, अशा असतात. अशाच काही आठवणींना जॉर्डनमधील रेफ्युजींनी उडाळा दिला आणि या कठीण प्रसंगीदेखिल या निमित्ताने का होइना त्यांच्या चेहऱ्यावर हास्य उजळले. एकातरुणीने तर सांगितले. तिला त्या मित्रांनी वाढदिवसाला ग्रिटींग दिले. पण त्यानंतर दोन दिवसांतच ते मारले गेले. ते ग्रिटींग आजही तिच्याकडे आहे.

या सर्वांनी सोबत आणलेल्या या खास वस्तू केवळ वस्तू नाहीत तर त्यांच्या मनात असलेल्या आशेचे मूर्त स्वरुपच आहे असे म्हणायला हरकत नाही. कारण त्या आठवणींच्या बळावरच ते एवढ्या धैर्याने या संकटाचा सामना करत आहेत. चला तर पाहुयात या रेफ्युजींसाठी सर्वात महत्त्वाची अशी ती कोणती गोष्ट आहे.
कोणी आजीने दिलेली घड्याळ तर कोणाकडे आईची आठवण म्हणून ठेवलेला नेकलेस...वाचा कोणाकडे आहेत काय महत्त्वाच्या वस्तू...