आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हॉट्सअॅपवर आता चुकून गेलेला मॅसेज डिलीट करता येणार, लवकरच नवे फीचर्स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - जगातील सर्वात लोकप्रीय मॅसेज अॅप पैकी एक व्हॉट्सअॅपवर आता चुकून गेलेला मॅसेज परत घेता येणार आहे. त्यामुळे, नजरचुकीने किंवा तांत्रिक अडचणींमुळे एखाद्या व्यक्तीला गेलेल्या मॅसेज किंवा मजकूरावर होणारी नामुष्की टाळता येईल. व्हॉट्सअॅपने सध्या हे फीचर अॅन्ड्रॉइडच्या बीटा व्हर्जनवर आणि वेबला सुरू केले आहे.
 
व्हॉट्सअॅप अपडेटवर बारकाईने नजर ठेवणारे ट्वीटर पेज @WABetainfo आगामी फीचर्सची माहिती जाहीर केले. यात दोन स्क्रीनशॉट शेयर करण्यात आले आहेत. त्यापैकी एकामध्ये व्हॉट्सॅपवरून एखाद्या व्यक्तीला पाठविलेला नकोसा मॅसेज रिव्होक करणे किंवा एडिट करण्याची सोय असल्याचे सांगण्यात आले. पाठवलेला मॅसेज डिलीट करण्यासाठी आणि एडिट करण्यासाठी 5 मिनिटांचा वेळ दिला जाईल. बीटा अॅप व्हर्जनवर सुरू करण्यात आलेला हा फीचर व्हॉट्सअॅपने पुन्हा परत घेतला असून त्यावर सविस्तर चाचण्या घेतल्या जात आहेत. हाच फीचर व्हॉट्सअॅप वेबवर सुरू असल्याचे सुत्रांकडून समजते. यासोबत, एखाद्या ग्रुपवर येणाऱ्या असंख्य मॅसेजेसमध्ये आपले मॅसेज विशेष दाखवण्यासाठी व्हॉट्सअॅपने टेक्स्टला बोल्ड, इटॅलिक आणि स्ट्राइक थ्रू करण्याची सुविधा सुद्धा आगामी अपडेटमध्ये करण्याचे संकेत आहेत. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...