आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...तर, अॅपल-आयबीएम इथपर्यंत पोहोचले नसते ; ग्लोबल टॅलेन्टला डावलू नका - आरबीआय गव्हर्नर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाईल) - Divya Marathi
(फाईल)
न्युयॉर्क - अॅपल, सिस्को, आयबीएम आणि अशाच जगात नावाजलेल्या कंपन्या ग्लोबल टॅलेन्टच्या जोरावरच यशस्वी झाल्या. या कंपन्यांना ग्लोबल टॅलेन्ट लाभले नसते, तर त्यांना इथपर्यंत पोहचणे शक्य झाले असते का? असा सवाल आरबीआय गव्हर्नर उर्जीत पटेल यांनी अमेरिकेतील कार्यक्रमात उपस्थित केला. 
 
अमेरिकन कंपन्यांनाही फायदा झाला
आरबीआय गव्हर्नर पटेल यांनी न्युयॉर्कला जाऊन तेथील विद्यार्थ्यांना लेक्चर दिला. यात आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वत्र ओपन ट्रेडिंगची चर्चा उठत असल्याचा मुद्दा त्यांनी अधोरेखित केला. जगभरातील प्रभावशाली कॉर्पोरेशन्स, कंपन्यांचे शेयर आज ज्या स्थितीमध्ये आहेत, त्याचे श्रेय ग्लोबल टॅलेन्टला जाते. यात प्रामुख्याने अमेरिकन कंपन्यांचाही समावेश आहे असे पटेल म्हणाले. ते कोलंबिया युनिव्हर्सिटीतील राज सेंटर ऑन इकोनॉमिक्स पॉलिसी तर्फे आयोजित एका लेक्चरमध्ये बोलत होते.
 
ट्रम्प यांचे अमेरिका फर्स्ट धोरण
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उद्योग आणि नोकऱ्यांसह प्रत्येक बाबतीत अमेरिका फर्स्ट धोरण लागू करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे, अमेरिकेतील माहिती तंत्रज्ञान आणि प्रमुख उद्योगांमध्ये काम करणाऱ्या भारतीयांच्या नोकऱ्यांवर गंडांतर येण्याची भिती आहे. एवढेच नव्हे, तर अमेरिकेने काही दिवसांपूर्वीच भारतीयांना दिल्या जाणाऱ्या जलद व्हीसा योजनांसह अनेक योजना गुंडाळल्या. एकूणच जागतिकरणासाठी आणि अमेरिकेच्या विकासासाठी हा प्रोटेक्शनिझ्म घातक ठरू शकतो असा अप्रत्यक्ष इशारा आरबीआय गव्हर्नर पटेल यांनी दिला.
बातम्या आणखी आहेत...