आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • White House In Final Stages Of Drafting Plan To Close Guantanamo Prison

Guantanamo Bay : जगातील सर्वात वादग्रस्त तुरुंग बंद होण्याच्या मार्गावर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन- अमेरिकेचे क्युबासोबतचे संबंध मधुर बनू लागले आहेत. त्याचाच भाग म्हणजे अमेरिकेने क्युबाच्या ग्वाँटानामो उपसागरातील तुरुंग बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. व्हाइट हाऊस यासंबंधीच्या प्रस्तावावर शेवटचा हात फिरवत आहे; परंतु काँग्रेस सदस्यांच्या सहमतीनंतरच त्यावर शिक्कामोर्तब होईल. हे तुरुंग सर्वात वादग्रस्त तुरुंग म्हणून ओळखले जात होते.

ग्वाँटानामो येथील तुरुंग बंद करण्याचा निर्णय सरकारने अगोदरच घेतला होता, परंतु त्याला काँग्रेसकडून सातत्याने विरोध होत राहिला. तथापि, आता संबंधीत प्रस्तावाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. राष्ट्राध्यक्षांच्या प्राधान्यक्रमामध्ये तुरुंग बंद करण्याचा निर्णयदेखील आहे. त्यामुळे प्रशासन तातडीने हालचाली करू लागले आहे. खरे तर हे अत्यंत गुंतागुंतीचे काम असले तरी आम्ही त्यात बरीच गती मिळवली आहे, असे व्हाइट हाऊसचे प्रवक्ते जॉश अर्नेस्ट यांनी स्पष्ट केले. त्याशिवाय अमेरिका-क्युबा यांच्यात आग्नेय क्युबातील एका नौदल तळावरून वाद आहे. हे नौदल अमेरिकेने उभारलेले आहे. हे तळ बंद करण्याची मागणी क्युबाचे परराष्ट्रमंत्री ब्रुनो रॉड्रिग्ज यांनी केली. परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांनी या मुद्द्यावर कारवाई करावी, असे रॉड्रिग्ज यांनी हवाना येथे बोलताना सांगितले. दुसरीकडे क्युबातील वादग्रस्त तुरुंग बंद करण्याची योजना आेबामा यांनी २००९ मध्ये मांडली होती; परंतु त्याला काँग्रेसने वारंवार विरोध केल्याने तो प्रस्ताव बारगळला होता. तुरुंगातील कैदी अमेरिकेतील तुरुंगात हस्तांतरित करण्याला काँग्रेसचा विरोध होता.
आयएसचा अधिक धोका
अल-कायदापेक्षा इस्लामिक स्टेटचा मोठा धोका असल्याचा इशारा अमेरिकेची गुप्तहेर संस्था एफबीआयचे प्रमुख जेम्स कॉमी यांनी दिला आहे. अॅस्पिन सिक्युरिटी फोरमच्या एका कार्यक्रमात मार्गदर्शन करताना कॉमी बोलत होते. आयएस हा अल-कायदामधून फुटलेला गट आहे. या गटाने शेकडो एकर जमीन बळकावली आहे. त्यामुळे खबरदारी गरजेची आहे.

बळकावलेला भूप्रदेश
अमेरिकेने ग्वाँटानामो भूप्रदेश अनेक वर्षांपासून बळकावलेला आहे. हा सरळसरळ आमच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन करण्याचा प्रकार आहे. अमेरिकेने आमच्या सार्वभौमत्वाचा आदर करायला हवा. तसे झाल्यानंतरच दोन्ही देशांतील संबंध सुरळीत होण्यास मदत होऊ शकेल, असे क्युबाचे परराष्ट्रमंत्री रॉड्रिग्ज यांनी म्हटले आहे.

करार नाही..
१९०३ मध्ये करार झाला होता, हा दावा खोटा आहे. गेल्या पन्नास वर्षांत अमेरिकेसोबत कसलाही करार झालेला नाही, असे क्युबाने स्पष्ट केले आहे.

तुरुंग वादात...
अमेरिका आग्नेय क्युबाच्या ग्वाँटानामो बेटावर लष्करी तुरुंग चालवते. तेथे विविध देशांतील गुन्हेगारांना ठेवून त्यांची अमानुषपणे चौकशी केली जाते, असा आरोप नेहमीच होत आला आहे. दक्षिणेकडील हे सर्वात मोठे बंदर आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, या तुरुंगाचे PHOTOS