आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकला विरोध, याचिकेवर लाख स्वाक्षऱ्या; व्हाइट हाऊसकडे ऑनलाइन मागणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क - पाकिस्तानला दहशतवादाला निर्यात करणारा देश म्हणून जाहीर करण्यात यावे, अशी मागणी करणारी ऑनलाइन याचिका दाखल करण्यात आली आहे. व्हाइट हाऊसला ती पाठवण्यात आली आहे. त्यावर लाखाहून अधिक नागरिकांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत.
गेल्या आठवड्यात भारतीय वंशाचे अमेरिकी समुदायाकडून आपल्या भावना व्यक्त करणारी याचिका दाखल करण्यात आली होती. लाख १० हजारांहून अधिक नागरिकांनी हाच सूर लावला. व्हाइट हाऊसच्या संकेतस्थळावरील सर्वात लोकप्रिय याचिकांमधील तिसरी लोकप्रिय याचिका म्हणून याची नोंद झाली आहे. आेबामा प्रशासनाकडून त्याला ६० दिवसांत प्रतिसाद द्यावा लागणार आहे, असा देशाचा नियम आहे. २१ सप्टेंबर रोजी ऑनलाइन याचिका दाखल करण्यात आली होती. काँग्रेसमन टेड पो, काँग्रेसमन डाना रोहराबाचर यांनी यासंबंधीचा प्रस्ताव सभागृहात मांडला होता. त्यात पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र म्हणून जाहीर करण्याची मागणी करण्यात आली होती.

‘डकोटा अॅक्सेस पाइपलाइन’ ठरले लोकप्रियतेत अव्वल
अमेरिकेत आतापर्यंत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. त्यापैकी डकोटा अॅक्सेस पाइपलाइन संबंधी कैफियत मांडणारी याचिका सर्वाधिक चर्चेत राहिली आहे. याचिकेवर लाख १० हजारांहून अधिक नागरिकांनी स्वाक्षरी केली होती. त्यानंतर अन्य एका याचिकेवर लाख ३७ हजार नागरिकांनी स्वाक्षऱ्या केल्या होत्या.

अमेरिकेसाठी महत्त्वाची
ऑनलाइन याचिका अमेरिकेतील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण पाकिस्तानने प्रायाेजित केलेल्या दहशतवादाचा फटका नेहमीच बसत आला आहे, असे याचिकाकर्त्यांनी म्हटले आहे.

क्षमता वाढवण्यासाठी मदत करण्याची भूमिका
पाकिस्तानने दहशतवादाच्या विरोधातील आपली क्षमता वाढवली पाहिजे. पाकिस्तानात दहशतवाद्याच्या विरोधात मोहीम सुरू आहे. परंतु त्यांची क्षमता वाढली पाहिजे. त्यासाठी आम्ही त्यांना मदत करत आहोत. देशाने दहशतवादाच्या विरोधातील लढाईत तुलनेने मोठी प्रगती केली आहे, असे आम्हाला वाटते, असे व्हाइट हाऊसचे उपप्रवक्ते मार्क टोनर यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...